नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात आगमन झाले असून, पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरगाण्यात शनिवारी सकाळी अतिवृष्टी होऊन नदी-नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील मोहपाडा येथील भिसोंडी नदीच्या पाण्यात मोतीराम सखा धूम (४५) या शेतकºयाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. याच नदीतून मार्गक्रमण करणाºया दोघा वाहनचालकांना गावकºयांनी पाण्याबाहेर काढले आहे.शनिवारी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेच्या दरम्यान सुरगाणा तालुक्यात सरासरी १४१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. जणूकाही ढगफुटी झाल्याच्या आविर्भावात धो धो कोसळलेल्या पावसामुळे तालुक्यातील नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, दुपारी मोहपाडा- खुंटविहीर या रस्त्यावरील भिसोंडी नदीला पूर आल्याने या नदीचा पूल पार करून किराणा सामान घेण्यासाठी घराबाहेर पडलेले मोतीराम सखा धूम (४५) हे पुलावरून जात असताना अचानक पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. त्यांच्या पाठोपाठ दोघे दुचाकीस्वार पूल पार करीत असताना त्यांनाही दुचाकीसह पाण्याने ओढून नेले. सदरची बाब गावकºयांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने पाण्यात उड्या घेऊन दोघांना वाचविले, परंतु मोतीराम धूम हे पाण्याच्या प्रवाहात दूर वाहून गेल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. काही वेळाने त्यांचा मृतदेह पाचशे मीटर अंतरावर सापडला.जिल्ह्णात शनिवारी पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. विशेष करून पेठ, दिंडोरी, सुरगाणा व कळवण तालुक्याला पावसाने झोडपून काढले. दिंडोरी तालुक्यातील ननाशी, कोशिंबे, वणी परिसरातही तुफान पाऊस झाला. चांदवड, देवळा, बागलाण तालुक्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.तलावात बुडून मृत्यूनिफाड तालुुक्यातील गोरठाण येथे शेळीपालन करणारे उमाकांत सुकदेव मोरे हा ६६ वर्षीय इसम साठवण तलावात बुडून मरण पावला आहे. शुक्रवारी मोरे हे दुपारी एक वाजता दगू मुरलीधर ढोमसे यांच्या गट नंबर १०६ मध्ये शेळ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी तलावात तोल गेल्याने ते बुडून मरण पावले.
सुरगाण्यात अतिवृष्टी; बुडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 12:50 AM
नाशिक : गेल्या आठ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे शुक्रवारी मध्यरात्रीपासून जिल्ह्यात आगमन झाले असून, पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरगाण्यात शनिवारी सकाळी अतिवृष्टी होऊन नदी-नाल्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने तालुक्यातील मोहपाडा येथील भिसोंडी नदीच्या पाण्यात मोतीराम सखा धूम (४५) या शेतकºयाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. याच नदीतून मार्गक्रमण करणाºया दोघा वाहनचालकांना गावकºयांनी पाण्याबाहेर काढले आहे.
ठळक मुद्देदोघा वाहनचालकांना गावकºयांनी पाण्याबाहेर काढले