नाशिकरोड : अखिल हिंदी साहित्य सभेतर्फे नाशिकरोड येथील उत्सव हॉटेलमध्ये आज राष्ट्रीय हिंदी साहित्य समारंभ व हिंदी कविसंमेलन झाले. संस्थेचे अध्यक्ष सुबोध मिश्रा, घनश्याम अग्रवाल, डॉ. आनंद प्रकाश गौड, ओम तिवारी, डॉ. प्रियंका सोनी, कपिलदेव प्रसाद मिश्र, संजीव त्रिवेदी आदींची प्रमुख उपस्थिती होती. देशभरातून हिंदी साहित्यिकांनी हजेरी लावली होती. सकाळच्या सत्रात पुरस्कार वितरण झाले. विद्याभारती आणि सार्थ नव्या या स्मरणिकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सुबोध मिश्रा म्हणाले की, हिंदी सभा संस्था, हिंदी, उर्दू, मराठी भाषेचा संगम असलेली संस्था आहे. डॉ. आनंद प्रकाश गौड म्हणाले की, साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब आहे. समाजात जे घडते त्याचे रूप साहित्यात दिसते, असे सांगितले. दुपारच्या सत्रात कविसंमेलन झाले. ओम तिवारी, डॉ. प्रियंका सोनी, सुबोध मिश्रा, कपिलदेव प्रसाद मिश्र, संजय त्रिवेद, घनश्याम अग्रवाल, रमेश शर्मा आदी यावेळी उपस्थित होते. स्वप्नील कुलकर्णी, राजेश झणकर, श्रद्धा शिंदे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. दीपा कुचेकर व सी. पी. मिश्रा यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. भरत सिंग यांनी आभार मानले.वाराणसीचे डॉ. कपिलदेव प्रसाद मिश्र यांना यंदापासून सुरू झालेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवी पुरस्कार देण्यात आला. डॉ. सुधा चौहान (इंदोर), सुनीता डागा (पुणे), रामबाबू निरव (पटना), डॉ. राधेश्याम भारतीय (जयपूर), डॉ. रंजना गौड (फैजाबाद), डॉ. रोचना भारती (नाशिक), सूरचना त्रिवेदी (लखनऊ), डॉ. संगीता सक्सेना (जयपूर), विनय सक्सेना (दिल्ली), डॉ. रमेश मिलन (मुंबई) यांना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हिंदी हास्य कविसंमेलन रंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:00 AM