शनिवारी दुपारी कमलनगर परिसरात राहणाऱ्या बेबी भूषण राठोड या पाटाकडून घराकडे पायी जात होत्या. पाऊस सुरू असल्याने राठोड यांनी डोक्यावर छत्री धरली होती. त्याचाच फायदा घेत सोनसाखळी चोरांनी सोनसाखळी ओरबाडली व पाटाच्या रस्त्याने दुचाकीने फरार झाले.
सदर घटनेचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत हे चोरटे दुचाकीवरून जातानाचे कैद
झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी हिरावाडी रोडवर ज्येष्ठ महिलेला पोलीस असल्याची बतावणी करून तिच्या अंगावरील सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने काढून घेतल्याची घटना घडली होती. सोनसाखळी चोरांनी काही दिवसांपासून हिरावाडी रोड परिसर लक्ष्य केल्याने महिलांना दिवसा रस्त्याने पायी चालत जाणे अवघड झाले आहे.