पंचवटी : गोदाघाटावरील अनेक पुलांची दुरवस्था झाली आहे. दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव येथे असलेला ब्रिटिशकालीन पूल लवकरच इतिहास जमा होणार असून, त्याजागी जवळपास एक कोटी २९ लाख रुपये खर्च करून नवीन पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या निर्मितीनंतर त्याची देखभाल, दुरुस्ती झाली नव्हती. दिवसेंदिवस पूल धोकादायक झाल्यामुळे या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.मनपाने काही महिन्यांपूर्वीच आडगावचा ब्रिटिशकालीन पूल कमकुवत आहे, असे जाहीर करून पुलावर अवजड वाहनांना प्रवेश बंद केला होता. तर धोकादायक पूल जाहीर झाल्याने परिवहन महामंडळाने सुरक्षेच्या कारणास्तव बस वाहतूकही बंद केली आहे. या पुलामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने व विशेष करून आडगाववासीयांना अनेक अडथळे पार करावे लागत असल्यामुळे नगरसेवक शीतल माळोदे यांनी सदरचा पूल पाडून त्याजागी नवीन पूल उभारणीचा प्रस्ताव महापालिकेत सादर केला होता. अलीकडेच महापालिकेने आडगावी नवीन पूल बांधणीसाठी एक कोटी २९ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली असून, लवकरच ब्रिटिशकालीन पूल पाडून त्याजागी नवीन पूल उभारण्यात येणार आहे.नवीन पूल उभारणीचा निर्णयपुलाच्या निर्मितीनंतर त्याची देखभाल, दुरुस्ती झाली नव्हती. दिवसेंदिवस पूल धोकादायक होत असल्यामुळे या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आल्याने अखेर महापालिकेने सदरचा पूल पाडून त्या जागी नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेतला.या पुलामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याने व विशेष करून आडगाववासीयांना अनेक अडथळे पार करावे लागत असल्यामुळे नगरसेवक शीतल माळोदे यांनी सदरचा पूल पाडून त्या जागी नवीन पूल उभारणीचा प्रस्ताव महापालिकेत सादर केला होता.गोदावरी नदीवरील पुलांचे कठडे तुटलेयंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरीला आजवरचा सर्वात मोठा महापूर आला. या पुरामुळे नदीवरील लहान-मोठ्या पुलांचे कठडे वाहून गेल्याने सदर पूल अजूनही धोकादायक स्थितीत आहेत. या पुलांवरून रोजच ये-जा सुरू असल्याने पुलांची डागडुजी तसेच नव्याने कठडे बांधणे गरजेचे आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून धोकादायक झालेले पूल त्याच स्थितीत असल्याने धोका वाढला आहे.
ब्रिटिशकालीन पूल होणार इतिहास जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 1:23 AM