नाशिक : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे यांनी लिहिलेल्या ‘चौकांचा इतिहास’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यमाने आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी बोलताना तांबे यांनी सांगितले की, झेंडे अण्णांनी नाशिकच्या चौकांचा दुर्मिळ इतिहास पुस्तकरूपाने समस्त नाशिककरांना उपलब्ध करून दिला आहे. शहरातील चौक माहीत असतात, परंतु त्यांचे वैशिष्ट्य आणि त्यांच्या नावाचा इतिहास माहीत नसतो, ते काम झेंडे अण्णांनी चोख केले आहे. चौकांचा इतिहास या पुस्तकामुळे नाशिक शहरात नव्यानेच आलेल्या नागरिकांना तसेच पर्यटक आणि भाविकांना देखील शहराची ओळख होणार आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील कुटे यांनी, तर आभार प्रदर्शन भामरे यांनी केले. के. के. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या कम्युनिटी सभागृहात झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास के. के. वाघ महाविद्यालयाचे बाळासाहेब वाघ, चांगदेवराव होळकर, नांदूरकर, गुंजाळ, माणिकराव बोरस्ते, शंकरराव बर्वे, किशोर आहिरराव आदी उपस्थित होते.
नाशिकच्या दुर्मिळ चौकांचा इतिहास पुस्तकरूपाने : तांबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:27 AM