नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात शहरातील काही सायकलपटू थेट भिंतीच्या वरील बाजूने असलेल्या रस्त्यावर सायकलिंग करत असल्याचा प्रकार वाढला होता. यामुळे जलसंपदा विभागाकडून अशा सायकलपटूंना दणका देण्यात आला आहे. संबंधितांच्या सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.अलीकडे नाशिक शहर व परिसरात उच्चभ्रू लोकांमध्ये सायकलिंगची क्रेझ वाढीस लागत आहे. सायकल चळवळीचे शहर अशी नवी ओळख मिरवणा?्या या शहरातील काही हौशी हुल्लडबाज सायकलपटू डांबरी रस्ते सोडून थेट विकेंड ला गंगापूर धरणाच्या संरक्षक भिंतींवर सायकलिंग्करु लागल्याने संताप व्यक्त केला जात होता. याबाबत जलसंपदा विभागाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या. अखेर गंगापूर धरणाचे शाखाअभियंता सुभाष मिसाळ यांनी याप्रकरणी गंभीरपणे दखल घेत सायकल जप्तीची मोहीम राबविली. या दोन दिवसांत एकूण 30 महागड्या आधुनिक बनावटीच्या सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये एक सायकल तर सुमारे 80 हजारांची आहे. सुमारे तीन ते साडे तीन लाखांचा हा ऐवज आहे.गोवर्धन गावाच्या पुढे वनविभागाच्या रोपवाटिकेच्या रस्त्याने मागील बाजूने सायकलिंगसाठी शहरातील काही बड्या लोकांची सुपुत्र थेट गंगापूर धरणाची भिंत गाठू लागले होते. दिवसेंदिवस ही संख्या वाढू लागल्याने जलसंपदा विभागाच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली. एका बाजूला गंगापूर धरण 100 टक्के भरलेले असताना दुसरीकडे हे महाभाग थेट धरणाच्या भिंतीवरील रस्त्यावर सायकलिंग करताना आढळून आल्याने सूत्रांनी सांगितले.हायप्रोफाईल 'वशिला'धरण परिसरात कारवाई करताना शहरातील बहुतांश प्रतिष्ठित उच्चभ्रू व्यक्तींची ही मुले असल्याचे समोर आले.यामुळे जलसंपदा विभागाकडे अनेक मोठे अधिकारी, वकील, व्यावसायिकांनी फोनाफोनी करत सायकल सोडवण्यासाठी 'वशिला' लावला मात्र गंगापूर धरण सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने पोलिसांकडून संबंधितांवर योग्य कारवाई झाल्यानंतर सायकली देण्यात येतील असा कठोर पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे अनेकांची डाळ शिजली नाही.सोशलमीडियाची हौस; सायकलिंगची मौजस्वत:ची अन गंगापूर धरणासारख्या महत्वाच्या प्रकल्पाची सुरक्षितता धोक्यात आणून हे हौशी सायकलपटू केवळ प्रसिद्धीची हौस भागविण्यासाठी थेट धरणाच्या भिंतीवर सायकलिंगचा प्रताप करत होती. सायकलिंग करताना व्हिडीओ, फोटो शूट करत ती फेसबुक, व्हाट्सएप, इन्स्टाग्रामवर अपलोड केली जात होती. या ठिकाणी सायकलिंग करणा?्यांमध्ये केवळ तरुण आहे, असे नाही तर काही युवतींचाही सहभाग असल्याचे दिसून आले आहे.'जॅकवेल'च्या लोखंडी पुलावर सायकलिंगसायकलिंगचा प्रताप केवळ गंगापूर धरणाच्या भिंतीपुरताच मर्यादित राहिला नाही तर काही हौशीनी चक्क डावा तट कालव्याला गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा 'जॅकवेल'च्या लोखंडी पुलावरून सायकल स्टंट करत खूप चांगले 'धाडस' दाखविल्याच्या आविर्भाव मिरवीत ती छायाचित्रे, व्हिडीओ सोशीलमीडियावरसुद्धा झळकविले.