चांदवड : शहरात वीकेंड लॉकडाऊनचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर नगर परिषदेच्या वतीने दंडात्मक कारवाई केल्याची माहिती मुख्याधिकारी अभिजित कदम, पवनकुमार कस्तुरे यांनी दिली. ब्रेकिंग द चेन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कठोर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या सूचनेनुसार नगर परिषद व प्रशासनातर्फे वेळोवेळी कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. या अंतर्गत कोरोना विषाणूचा प्रसार कमी करण्याच्या उद्देशाने शनिवार व रविवार हे दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले आहेत. नागरिकांच्या सहकार्याने व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वीकेंड लॉकडाऊन यशस्वी करण्यात प्रशासनास यश येत आहे. परंतु वारंवार सूचना देऊनही काही व्यावसायिकांद्वारे वीकेंड लॉकडाऊनचे उल्लंघन होताना आढळत होते. त्यानुसार वीकेंड लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना मुख्याधिकारी अभिजित कदम व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाद्वारे प्रत्येकी रुपये पाच हजार असा एकूण तीस हजार रुपये इतका दंड करण्यात आला. शिवाय विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर एकूण तीन हजार पाचशे इतका दंड वसूल करण्यात आला.
------------------
नियमांचे पालन करावे
चांदवड उपविभागाचे प्रांत अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्यातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, नागरिकांच्या सहकार्याने कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे शक्य आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
------------------------------------------------------
फोटोची ओळ २९ चांदवड १- चांदवड येथील आठवडा बाजारात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करताना नगर परिषदेचे पवनकुमार कस्तुरे व कर्मचारी.
------------------------------------------------------
धोतरखेडे शिवारात घरगुती कारणावरून हाणामारी
चांदवड : तालुक्यातील धोतरखेडे शिवारात घरगुती कारणावरून हाणामारी झाली. फिर्यादी शंकरराव नरहरी निफाडे यांना रामकृष्ण नरहरी निफाडे, प्रसाद रामकृष्ण निफाडे (रा. धोतरखेडे) व दीपक गाजरे (रा. निफाड) यांनी शंकरराव निफाडे यांचा भाऊ सुरेश निफाडे याने त्याचे घर तेथून उतरून दुसरीकडे नेले नाही. या कारणावरून कुरापत काढून शंकरराव निफाडे यांना दीपक गाजरे यांनी गजाने मारहाण केली व गंभीर जखमी केल्याची फिर्याद शंकरराव निफाडे यांनी दिली. यावरून वडनेरभैरव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस उपनिरीक्षक डी. एम. गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. के. कराड करीत आहेत.
------------------------------------------------------------------------
चांदवडला एका दिवसात सहा नवीन रुग्ण
चांदवड : येथे दि. २८ जून रोजी घेतलेल्या ५१९ पैकी ६ अहवाल पॉझिटिव्ह आले. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये चांदवड, चांदवड एस.डी.एच., धोंडगव्हाण, हिवरखेडे दोन रुग्ण, बहादुरी आदी एकूण सहा जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.
===Photopath===
290621\29nsk_8_29062021_13.jpg~290621\29nsk_19_29062021_13.jpg
===Caption===
२९ सोयगाव~२९ चांदवड १