युवा मित्रच्या कार्यकारी संचालिका मनिषा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा उपक्रम राबविण्यात आला. येथील पाझर तलावात वर्षानुवर्षे साचत आलेल्या गाळामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीच्या पाण्यासाठी उपयोग होत नव्हता. त्यामुळे गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायत व शेतकरी यांनी पुढाकार घेतला. युवा मित्रच्या संकल्पनेतून तसेच टाटा ट्रस्ट व घरडा केमिकल्स यांच्या निधीतून कामाचे नियोजन करण्यात आले. गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ सरपंच रत्नाबाई ईश्वर माळी, जय बजरंग गाळ उपसा समितीचे अध्यक्ष अनिल शेलार व सचिव सुनिल ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. पोटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बंधाऱ्यातील गाळ आपल्या शेतात टाकून जमीन सुपीक करून घेण्याचे आवाहन केले. गाळ वाहून नेण्याची संपूर्ण प्रकिया समजावून सांगून त्याबद्दल कार्यक्रम व्यवस्थापक अजित भोर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी युवा मित्र संस्थेचे अभियंता धनंजय देशमुख, तालुका समन्वयक प्रितम लोणारे, ऋषिकेश डांगे यांच्या समवेत सुखदेव ढेपले, राजाराम शेलार, केरु चौधरी, बबन पोमनार, दीपक शेलार, शंकर शेलार, मोहन कासार, हरी माळी, संतोष पोमनार, बहिरु शेलार आदींसह शेतकरी उपस्थित होते.
कोट...
गाळ उपसा केल्यामुळे जलाशयात पाणीसाठा वाढणार असून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली जाणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांना तलावातील सुपीक माती शेतीसाठी उपयोगी असल्याने येथील शेतकरी गाळयुक्त माती टाकून आपल्या जमिनीची सुपीकता वाढविणार आहे. शेतकरी स्वत:च्या साधनाने गाळ वाहून नेऊन आपली शेती सुपीक करतांना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे.
- अनिल शेलार, अध्यक्ष, गाळ उपसा समिती
फोटो ओळी- २८हिवरगाव१
हिवरगाव येथे गाळ उपसा कामाचा शुभारंभप्रसंगी युवा मित्रच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे. समवेत अजित भोर, प्रितम लोणारे, रत्नाबाई माळी, अनिल शेलार आदीसह शेतकरी.
===Photopath===
280321\28nsk_12_28032021_13.jpg
===Caption===
हिवरगाव येथे गाळ उपसा कामाचा शुभारंभप्रसंगी युवा मित्रच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे. समवेत अजित भोर, प्रितम लोणारे, रत्नाबाई माळी, अनिल शेलार आदीसह शेतकरी.