शहरातील रस्त्यांची दुर्दशा तसेच अन्य समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून ही दखल घेण्यात न आल्याने अखेर नागरी सुविधा संघर्ष समितीच्या वतीने आज पालिका प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले.समितीचे एस एम भाले, राजाभाऊ पारीक, नरेंद्र कांबळे, गणपत पगारे, वसंत महाले, दिलीप आव्हाड, ऍड रमण संकलेचा, रत्नाकर कांबळे, आर बी ढेंगळे, सुनील देवकर, राजाभाऊ गवळी आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.शहरातील सर्व रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात यावे, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्दी धरणाच्या भिंतीची तसेच मुख्य जलवाहिनी ची पाणी गळती थांबवण्यात यावी, मोकाट जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा,नागरिकांच्या समस्या समजून घेण्यासाठी वर्षभरात दोनदा जनता दरबार घेण्यात यावा यासह अन्य मागण्याचे निवेदन आंदोलन कर्त्यांनी पालिका प्रशासनाला दिले.
मनमाडला नागरी सुविधा संघर्ष समितीचे पालिकेसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 8:03 PM
मनमाड: शहरातील मूलभूत नागरी संमस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मनमाड जेष्ठ नागरिकांच्या नागरी सुविधा संघर्ष समिती च्या वतीने पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्दे प्रशासनाला निवेदन : शहरातील समस्या सोडविण्याची मागणी