शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

शहरात विविध ठिकाणी भीक मागणारी २२ मुले ताब्यात

By admin | Published: December 24, 2015 12:25 AM

चाइल्ड लाइन व पोलिसांची मोहीम : बालसुधारगृहात रवानगी

नाशिक : सिग्नल, रेल्वेस्थानक, गंगाघाट व शहर परिसरातील विविध ठिकाणी भीक मागणाऱ्या महिला व लहान मुलांना ताब्यात घेण्यासाठी शहर पोलिसांनी व चाईल्ड लाईनच्या मदतीने बुधवारी (दि़ २३) शहरात संयुक्त मोहीम राबविली़ या मोहिमेत शहरातून सुमारे २० ते २२ भिकारी मुले ताब्यात घेण्यात आली असून, त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे़ तर मुलांसोबत ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांना न्यायालयाने जामीन दिला असून मुलांना ताब्यात घेण्यासाठी त्यांनी न्यायालयात गर्दी केली होती.सीबीएस, शालिमार, त्र्यंबक नाका, बिटको चौक, शरणपूररोड, शरणपूररोड पोलीस चौकी, गंगापूररोड तसेच शहरातील बहुतांशी वाहतूक सिग्नलवर लहान मुलांना कड्यावर घेऊन महिला भीक मागताना दिसतात़ या दयनीय अवस्थेतील बालकांना बघून दयेपोटी पैसे देणाऱ्यांचीही कमी नाही़ मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात या भिकाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली होती़ या पार्श्वभूमीवर शहर पोलीस प्रशासन व चाइल्ड लाइन यांच्यात संयुक्त मोहिमेबाबत तयारी सुरू होती़शहरात बुधवारी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत शहरातील अकरा पोलीस ठाणी व रेल्वे पोलीस यांनाही सहभागी करून घेण्यात आले होते़ या मोहिमेत त्र्यंबक नाका, सीबीएस, बिटको चौक, शरणपूररोड पोलीस चौकी व गंगाघाटावर भीक मागताना लहान मुले व महिला मोठ्या संख्येने आढळून आल्या. पंचवटी आणि सरकारवाडा या दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत २१ भिकारी मुले सापडली़ दरम्यान, नऊ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत भिकारी मुले सापडली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे़ दरम्यान, बहुतांशी पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांना या मोहिमेबाबत माहितीच नसल्याचे समोर आले असून ही मोहीम केवळ देखावा तर नव्हता ना, अशी चर्चा सुरू झाली आहे़ (प्रतिनिधी)