सातपूर : शेतकरीविरोधी कायदे व वीजबिल तसेच कामगारविरोधी श्रमसंहिता केंद्र सरकारने रद्द करावे म्हणून ‘सिटू’कडून कोड बिलाची होळी करुन निषेध व्यक्त करण्यात आला. खुटवडनगर येथील कामगार भवनसमोर ‘सिटू’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शेतकरीविरोधी तीन कायदे व वीजबिल तसेच कामगारविरोधी चार श्रमसंहिता केंद्र सरकारने रद्द कराव्यात, या मागणीसाठी कोडबिलाच्या प्रतीची होळी करुन निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात सिटूचे जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, संतोष काकडे, तुकाराम सोनजे, मुकुंद रानडे, संजय पवार, मोहन जाधव, गौतम कोंगळे, एन. डी. सूर्यवंशी यांच्यासह जिल्हा सीटू युनियनचे पदाधिकारी, नाशिक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी, रिक्षा चालक - मालक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
(फोटो १४ सीटू) शेतकरी कायद्याची होळी डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, संतोष काकडे, तुकाराम सोनजे, मुकुंद रानडे, संजय पवार, मोहन जाधव, गौतम कोंगळे, एन. डी. सूर्यवंशी आदींनी केली.