इगतपुरी : केंद्र सरकारच्या अॅडव्होकेट अॅक्टमधील सुचवलेल्या नवीन तरतुदीबाबत आक्षेप घेत इगतपुरी वकील संघाच्या सदस्यांनी या नवीन प्रस्तावित मसुद्याची होळी केली.संतापलेल्या वकिलांनी इगतपुरी न्यायालयाच्या आवारात विधेयकाची प्रत पेटवून होळी करण्यात आली. यावेळी इगतपुरी वकील संघाने तहसीलदार कार्यालयात येऊन निवासी नायब तहसीलदार संजय शिंदे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यासाठी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. वकिलांच्या भावना वरिष्ठांना कळविण्यात येईल, असे निवासी नायब तहसीलदारांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.यावेळी इगतपुरी तालुका वकील संघ बार असोसिएशनच्या वतीने निवासी नायब तहसीलदार संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बार संघाचे तालुकाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, उपाध्यक्ष अॅड. शेख मोहम्मद अकबर चांद, सचिव यशवंत कडू, अॅड. कैलास शिरसाठ, अॅड. जितेंद्र शिंदे, अॅड. सुनील रोकडे, अॅड. सागर वालझाडे, अॅड. मुन्ना पवार, सदस्य अॅड. ओमप्रकाश भरिंडवाल, अॅड. प्रशांत जोशी, अॅड. रोहित उगले, अॅड. सुशील गामपूर, अॅड. एन.एच. कातोरे, अॅड. प्रीती चांडक, प्रगती सुरते, बी.एन. वाजे उपस्थित होते. (वार्ताहर)
इगतपुरीत वकिलांकडून विधेयकाची होळी
By admin | Published: April 22, 2017 12:16 AM