ठळक मुद्देचिनने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ
मनमाड : कन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स शाखा आणि मनमाड शहर व्यापारी महासंघातर्फेचायना वस्तूंवर बहिष्कार टाकण्यात आला. तसेच चिनने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ चायना वस्तुंची होळी करण्यात आली.चिनच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी कल्पेश बेदमुथा, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिक, अरूण सोनवणे, योगेश भंडारी, गुरूदीपसिंग कांत, राकेश ललवाणी, श्यामकांत शिरोडे, संतोष लुणावत, दीपक शर्मा, किशोक नावरकर, आनंद लोढा, परेश बुरड, बलबीरसिंग कांत, संजय मुथा, प्रफुल्ल बोगावत, सागर शिनकर, अभिजित लोढा, संदेश बेदमुथा, भरत छाबडा, कुमार मेहानी आदी उपस्थित होते.