येवला : येथील महावितरण कार्यालयासमोर भाजपतर्फे वीजबील माफीसाठी वीजबिलांची होळी करत आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणार्या लॉकडाऊन काळात घरगुती, व्यवसायिक व शेतीविषयक वीजबिले भरमसाठ आली आहे. शासनाने आर्थिक दुर्बल घटकांना १०० युनिट वीजबिल माफी देण्याची घोषणा केली गेली, मात्र पूर्तता झाली नाही. बिले माफ करण्यात यावी किंवा विशिष्ट युनिटपर्यंत त्यात सूट देऊन जनतेचा आर्थिक भार हलका करावा, अशी मागणी भाजपने महावितरण अधिकार्यांकडे केली आहे. आंदोलनात नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, सरचिटणीस बापू गाडेकर, विजयकुमार श्रीश्रीमाळ, जिल्हा समिती सदस्य राजू परदेशी, महिला मोर्चा अध्यक्ष सविता बाबर, ओबीसी शहराध्यक्ष सुनील काटवे, युवा मोर्चा शहराध्यक्ष तेजस शिंदे, आध्यात्मिक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक गुप्ता, उपाध्यक्ष कुंदन हजारे, अल्पसंख्याक आघाडीचे कासीम शेख, बाळू साताळकर, ईश्वर पटेल, अमेय गंगापूरकर, चैतन्य पटेल, ऋषिकेश व्हावंहारे, रंजना लावरे, कीर्ती पहाडी, सुलेखा परदेशी, मनीषा बाबर, सारिका लावरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.