नाशिक : येथील आडगाव शिवारात राहणा-या शेतकरी तसेच नागरिकांना वीज वितरण कंपनीने मीटर वाचन करता अव्वाच्या सव्वा विज बिल देयके दिल्याने संतप्त झालेल्या शेतकरी तसेच नागरिकांनी मंगळवारी सकाळीआडगावात वीज बिलांची होळी करून वीज वितरण कंपनी व शासनाचा निषेध नोंदविला. आडगाव शिवारात राहणा-या अनेक शेतकरी तसेच नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून अव्वाच्या सव्वा तसेच वाढीव वीज देयके येत असल्याने नागरिक संतप्त झालेले आहेत.वाढीव विज देयकाबाबत वारंवार वीज वितरण कंपनीला कळवून देखील जास्तीचे बिल येण्याचे सत्र सुरूच असल्याने मंगळवारी संतप्त आडगावकरवासियांचा संतापाचा बांध फुटला त्यांनी वीज वितरण कंपनीचा निषेध म्हणून आडगावात वीज देयकांची होळी करून संताप व्यक्त केला. वाढती महागाई व अन्य समस्यांनी शेतकरी त्रस्त झालेले असतानाच त्यात भर म्हणून की काय वीज वितरण कंपनीने अव्वाच्या सव्वा वीज देयके देऊन आडगावकरवासीयांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून शासनाचा तीव्र निषेध केला आहे. स्थिर वीज दर आकार वाढवून आधीच महागाईने जनता त्रस्त झाली आहे. त्यातच नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात असलेले कारखानदार वाढत्या विस्ताराने त्रस्त झाले असून नाशिक मधील औद्योगिक वसाहत बाहेरच्या राज्यात नेण्याच्या प्रयत्नात आहे. यावेळी पोपट लभडे, उमेश शिंदे, दादा शिंदे, हिरामण शिंदे, रामभाऊ जाधव, संजय माळोदे, दौलत शिंदे, अभय माळोदे, गोरख लभडे, संजय शिंदे, दत्तू शिंदे, तुकाराम माळोदे, दिनकर शिंदे ,छगन राव शिंदे,रामकीसन माळोदे,आसिफ सैय्यद, कैलास लभडे, सोमनाथ माळोदे, भाऊसाहेब हळदे, हिरामण माळोदे आदी ग्रामस्थांनी वीज बिलांची होळी करून निषेध केला.
नाशिकला शेतकऱ्यांकडून वीज बिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 4:05 PM
वाढीव विज देयकाबाबत वारंवार वीज वितरण कंपनीला कळवून देखील जास्तीचे बिल येण्याचे सत्र सुरूच असल्याने मंगळवारी संतप्त आडगावकरवासियांचा संतापाचा बांध फुटला त्यांनी वीज वितरण कंपनीचा निषेध म्हणून आडगावात वीज देयकांची होळी करून संताप व्यक्त केला. वाढती महागाई व अन्य समस्यांनी शेतकरी त्रस्त
ठळक मुद्देअवास्तव बील आकारणी : कंपनीचा निषेध स्थिर वीज दर आकार वाढवून आधीच महागाईने जनता त्रस्त