नाशिक : केंद्र शासनाने केलेली कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी यासाठी सन्सदेच्या अधिवेशनात आवाज उठवाव अशी मागणी करत शेतकरी सँघटनेतरफे खासदार डॉ . भारती पवार यांच्या घरासमोर कांदा निर्यात बंदी आदेशाची होळी करण्यात आली . खासदार दिल्ली येथे असल्यामुळे त्यांच्या स्वीय सहायकाना निवेदन देण्यात आले .शासनाने कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान केले आहे.शासनाने नुकतेच शेती माल व्यपार सुधारना विधेयक मंजूर केले आहे. या कायद्या नुसार शेतकऱ्यांना आपला माल कोठेही विकन्याची मुभा दिली आहे . शासनाने या कायद्याचा भग करून काद्यावर निर्यात बंदी लादली आहे.गेली सहा महिने काद्याला एकदम कमी दर होत्ते त्या वेळेस सरकारने शेतकºयाना कोणतीही मदत केली नाही. आता कुठे परवडतील असे दर मिळयाला लागले असता सरकारने कांदा निर्यात बद करून शेतकºयाचा विश्वासघात केला आहे खासदारांनीं संसदेच्या आधिवेशनत कांदा उत्पादकांची बाजू प्रभाविपणे मांडून कांदा निर्यात बंदी कायमची उठवावि व देशाची ढासळती अर्थ व्यवस्था वाचवावि अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे . यावेळी देविदास पवार, अर्जुन बोराडे , शताराम जाधव, तानाजी जडे, कचरु बागुल, सुरेश जाधव, रामनाथ ढिकले, माणिक देवरे, भाऊसाहेब धुमाळ, बाळासाहेब शेवले, व शेतकरी उपस्थित होते.