नामपूर : महावितरणने राज्यातील ग्राहकांना दिलेल्या वाढीव वीजबिलांचा निषेध करीत भाजपच्या वतीने नामपूर येथे वीजबिलांची होळी करण्यात आली. कोविड १९ या महाभयंकर रोगाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन झाले. या कालावधीत वीज मंडळाने सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक व कृषिपंपांना वाढीव वीजबिले दिली. राज्य सरकारच्या विरोधात आमदार दिलीप बोरसे, किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा यांच्या नेतृत्वाखाली बिलांची होळी करण्यात आली. यावेळी माजी सरपंच किरण अहिरे, तळवाडे भामेरचे माजी सरपंच श्यामसुंदर गायकवाड, सोसायटीचे माजी चेअरमन नकूल सावंत, ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबक सोनवणे, भाजपा शहराध्यक्ष दीपक सोनवणे, जिल्हा सरचिटणीस रूपेश शाह, तालुका सरचिटणीस किरण ठाकरे, तालुका उपाध्यक्ष विजय अहिरे, तालुका चिटणीस राजेंद्र धोंडगे, समाधान पटांगडे, सचिन हिरे, रामचंद्र अहिरे, अभाविपचे प्रभू सोनवणे, ओम पाटील, शेखर मोरे, अत्याचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष हेमंत सूर्यवंशी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होत.
नामपूरला निषेध करत वाढीव वीजबिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:51 PM
नामपूर : महावितरणने राज्यातील ग्राहकांना दिलेल्या वाढीव वीजबिलांचा निषेध करीत भाजपच्या वतीने नामपूर येथे वीजबिलांची होळी करण्यात आली. कोविड १९ या महाभयंकर रोगाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन झाले. या कालावधीत वीज मंडळाने सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक व कृषिपंपांना वाढीव वीजबिले दिली. राज्य सरकारच्या विरोधात आमदार दिलीप बोरसे, किसान सेलचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा यांच्या नेतृत्वाखाली बिलांची होळी करण्यात आली.
ठळक मुद्देवाढीव वीजबिलांचा निषेध