सिडको : काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४२ जवान शहीद झाल्याने भाजपाच्या वतीने विजयनगर येथे तीव्र निषेध करण्यात आला. तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याबरोबरच पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. विजयनगर येथे नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या सपंर्क कार्यालयाजवळ शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी भाजपा सिडको मंडळ अध्यक्ष बाळासाहेब पाटील, नगरसेवक मुकेश शहाणे, छाया देवांग, संजय भामरे, धनाजी लगड, शिवाजी बरके, भूषण राणे, दिलीप देवांग, गणेश अरिंगळे, मदन जमधडे, रामदास जाधव, गजानन हुमने, शशी गरुड, सचिन अहिरे, योगेश शहाणे, नाना ठोंबरे, मोहसीन अन्सारी, योगेश सरोदे, राहुल भारध्वज आदी उपस्थित होते.
सिडकोमध्ये भाजपाकडून पाकिस्तानच्या ध्वजाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 1:03 AM