नाशिक : येथील चेतना नगर, सावरकर चौक परिसरातील १४ शाळकरी मुलांनी 'चेंबर ऑफ सिक्रेट' या त्यांच्या बालगोपाळांच्या ग्रुपने जमलेली होळीची रक्कम 'पीएम-सीएम केअर' करोना निधीसाठी समर्पित करण्यात आली.
या बाल मंडळामार्फत गल्लीतील सण उत्सव साजरे करण्यात येतात. होळीसाठी लागणाऱ्या गोवऱ्या, पूजा साहित्य इत्यादीसाठी परिसरातील मुलांनी त्यांच्या गल्लीतून घराघरातून २१ व ५१ रुपये वर्गणी गोळा केली. त्यात त्यांचे सुमारे ६५० रुपये जमा झाले होते. त्यापैकी या चिमुकल्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी प्रत्येकी १०१ रुपये ऑनलाईन जमा केले. उर्वरित रक्कमेतून होळीचा खर्च भागवण्यात आला.बाल मंडळाच्या कार्यकर्त्यांत सर्वेश सोनवणे, सर्वज्ञ अमृतकर, अथर्व मयेकर, गौरव कावले, अर्चित जाधव, प्रसुन तिवारी, सार्थक जामोदे, आराध्य डोळस, सर्वेश प्रभुणे, सृष्टी मयेकर, प्रथमेश सोनवणे, श्लोक शिंदे, प्रतीक तिवारी, सिद्धेश शिंदे, सर्वेश देशमुख यांचा समावेश आहे. चिमुकल्यांना लहान वयात असलेल्या सामाजिक जाणिवांमुळे चेतना नगर मधील त्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले.