ठळक मुद्देतालुका पातळीवरील शाळा बंद राहतील. मात्र, ग्रामीण भागातील शाळा सुरू राहणार आहेत. या निर्णयामुळे शाळा, महाविद्यालयांचे शैक्षणिक सत्र लांबणार आहे.
राज्यात करोना च्या रु ग्णांची संख्या वाढली आहे.शिवाय मानूर येथे संशयीत रु ग्ण आढळून आल्याने खबरदारी म्हणून राज्यसरकारकडून विविध पावले उचलली जात आहेत. आघाडी सरकारने शनिवारी मोठा निर्णय घेत शाळा, महाविद्यालयांना सुट्या जाहीर केल्या. मात्र, दहावी, बारावी आणि महाविद्यालयांच्या परीक्षा त्याचवेळेपत्रकानुसार सुरू राहणार आहेत.या निर्णयामुळे शाळा व्यवस्थापनांमध्ये काहीसा संभ्रम होता. शासन निर्णयाप्रमाणे तालुका पातळीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू राहणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे .