कळवण : विघ्नहर्ता गणरायाचे उत्साहात आगमन झाले. कळवण शहर व तालुक्यात कोरोना रु ग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनामुळे शासनाने गणेशोत्सवावर खूपच निर्बंध लादले आहेत. त्यामुळे अनेक गावांची ’एक गाव एक गणपती’ ही संकल्पना रु जण्याची मानिसकता प्रशासनाने मोडीत काढली असून,नागरिक घरगुती गणेशोत्सव साजरा करणार आहेत.तालुक्यातील अनेक गणेश मंडळाकडून आॅनलाइन परवानगी अर्ज सादर करण्यात आले. मात्र पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्यामुळे गणेश मंडळाकडून घरगुती गणेशोत्सव गणेश मंडळ साजरा करण्यावर भर देणार आहे. गणेश मंडळांना सोशल डिस्टन्सिंगसह स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे जगजीवन विस्कळीत झाले असून उद्योग व व्यवसाय यांची घडी बसलेली नाही त्यात ग्रामीण भागात रु ग्ण संख्या वाढल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे ग्रामीण, आदिवासी व शहरातील विविध मंडळानी साध्या पद्धतीने घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या गणेश मंडळांची संख्या देखील घटली असून बाल गणेश मंडळे मर्यादित आहेत. गेल्या वर्षी तालुक्यात 95 गावात एक गाव एक गणपती बसविण्यात आले होते. त्यात कळवण पोलिस स्टेशन हद्दीत कळवण शहरात 25 मोठ्या गणेश मंडळानी तर ग्रामीण भागात 15 मोठ्या गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली होती. कळवण शहरात 20 लहान गणेश मंडळानी तर ग्रामीण भागात 14 लहान गणेश मंडळानी गणरायाची स्थापना केली होती. तर 30 गावात एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली होती. अभोणा पोलीस स्टेशन हद्दीत 110 गणपती मंडळे होती. 45 गणेश मंडळानी तर 65 गावात एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली होती. यंदा मात्र सर्वांनी घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.