मनोज देवरेकळवण : दिवसेंदिवस झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असुन पर्यावरणाचा ऱ्हास होत असतांना नांदुरी येथील कळवण पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश गवळी व निसर्गप्रेमीसौजन्य ग्रुप यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी नांदुरी येथे वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाचा विधायक उपक्रम राबवला जात आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळतांनाच पोलिसांनी निसर्ग जोपासण्यासाठी चालवलेले प्रयत्न कौतुकाचा विषय ठरले असुन कळवण पोलिस स्टेशनसह गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांचे थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे.साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धपिठ असलेल्या सप्तशृंगीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातुन मोठ्या संख्येने भाविक येत असतात. सप्तशृंग गडाच्या परिसरात विविध औषधी वनस्पती असुन या परिसराला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. नांदुरी येथील पोलिस कर्मचारी योगेश गवळी यांच्या संकल्पनेतुन नांदुरीचा निसर्गप्रेमी सौजन्य ग्रुप व कळवण पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सप्तशृंग घाट ते नांदुरी नाक्यापर्यंत तसेच सप्तशृंग गडावर सुमारे एक हजार हून अधिक वृक्ष लावण्यात आले असुन त्यांची परिपुर्ण काळजी घेतली जात आहे.गवळी यांच्या या उपक्रमाची दखल घेत गृहमंत्री देशमुख यांनी आपल्या ट्विटर व फेसबुक अकाऊंटवर गवळी यांचे कौतुक केले आहे. त्यात त्यांनी गवळी यांचे कौतुक करत कळवण पोलिसांनी सामाजिक जाणिवेतून केलेले हे कार्य कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे. वृक्ष ही निसर्गाची अतिशय मौल्यवान संपत्ती असून आपण सर्व जण मिळून त्यांचे संवर्धन करूया असे आवाहनही देशमुख यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून केले आहे.दोन वर्षात हजाराहून अधिक वृक्ष लागवडदोन वर्षांपासून सुरू असलेल्या वृक्षारोपण व संवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून नांदुरी ते सप्तशृंग गड घाटात पाचशे ते सहाशे,गडावर पाचशे विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले आहेत. नांदुरी येथील तेरा महिला बचत गट तर सादडविहिर येथील सहा महिला बचत गटातील प्रत्येक महिलेला पाच असे एक हजार झाडे रोपण व संगोपनासाठी दिली आहेत.सुरवातीपासुनच निसर्गाशी जुळलेली नाळ कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. वृक्षारोपण व संवर्धन उपक्रमाची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेऊन कौतुक केले यामुळे अतिशय आनंद झाला असून निश्चितपणे आम्हाला प्रेरणा मिळाली आहे.- योगेश गवळी, पोलिस कॉन्स्टेबल.
निसर्गप्रेमी पोलिसांच्या कामाला गृहमंत्र्यांकडून कौतुकाची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 6:06 PM
कळवण : दिवसेंदिवस झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असुन पर्यावरणाचा ऱ्हास होत असतांना नांदुरी येथील कळवण पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश गवळी व निसर्गप्रेमीसौजन्य ग्रुप यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी नांदुरी येथे वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाचा विधायक उपक्रम राबवला जात आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळतांनाच पोलिसांनी निसर्ग जोपासण्यासाठी चालवलेले प्रयत्न कौतुकाचा विषय ठरले असुन कळवण पोलिस स्टेशनसह गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांचे थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे.
ठळक मुद्देनांदुरी घाटात पर्यावरण संवर्धन अन् वृक्षलागवडीने परीसराचा कायापालट