लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : निफाड तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी करून सर्वांना होम क्वॉरण्टाइन करण्यात येणार असल्याच्या चर्चेचा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी इन्कार केला आहे. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनाच निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. आतापर्यंत या रुग्णाच्या संपर्कातील ५० जणांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.कोरोना संसर्ग वाढल्यापासून राज्य आणि केंद्र सरकारने विशेष दक्षता घेण्यास सुरुवात केली. नाशिक जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणांनी अनेक उपाययोजना केल्या तसेच विदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणीदेखील केली.संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. त्यामुळे अनेक दिवस जिल्'ात कोरोना रुग्ण नसताना २ दिवसांपूर्वी निफाडमधील एका युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून, या रुणाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तथापि ज्या गावातील हा युवक आहे त्या संपूर्ण गावातील रहिवाशांना होम क्वॉरण्टाइन करण्यात येणार असल्याची शक्यता आहे, मात्र जिल्हाधिकारी मांढरे यांनी त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाच होम क्वॉरण्टाइन करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.दरम्यान, सदरचा रुग्ण असलेला युवक हा १२ मार्च रोजी अहमदनगर येथे कामानिमित्ताने गेला होता. त्यावेळी काही विदेशातून आलेल्या नागरिकांची त्याची भेट झाली होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या मोबाइलच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीदेखील आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.मुंबईच्या रेल्वे इगतपुरीत पार्कदेशातील रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई उपनगरात अनेक रेल्वे सध्या थांबलेल्या आहेत. मात्र सर्व रेल्वे त्याठिकाणी उभ्या करणे शक्य नसल्याने इगतपुरी पर्यंतच्या मार्गावर पार्किंगसाठी विविध स्टेशन्सवर त्या थांबवण्यात येणार आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईहून अशाच प्रकारे गोरखपूर एक्स्प्रेस इगतपुरीला आणण्यात येत होती त्यावेळी अनेक नागरिकांना विशेषत: मजुरांना ही रेल्वे गोरखपूरपर्यंत जाणार असे वाटल्याने ते या रेल्वेत बसले होते, मात्र इगतपुरी येथे आल्यानंतर रेल्वे थांबल्याने ते रुळाच्या मार्गावरून उत्तर भारताकडे पायीच निघाले होते, परंतु त्यांना परत पाठविण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले.
निफाड तालुक्यात ५० जण होम क्वॉरण्टाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 10:55 PM
नाशिक : निफाड तालुक्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी करून सर्वांना होम क्वॉरण्टाइन करण्यात येणार असल्याच्या चर्चेचा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी इन्कार केला आहे. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनाच निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे. आतापर्यंत या रुग्णाच्या संपर्कातील ५० जणांना होम क्वॉरण्टाइन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
ठळक मुद्देसंपर्कातील व्यक्तींचा शोध : विविध उपाययोजना