लासलगाव : लासलगाव ग्रामीण रु ग्णालयातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेले अठरा कोरोनाबाधित रु ग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. सेंटरमधून कोरोनामुक्त होत घरवापसी करणाऱ्यांची संख्या २४० पार झाली असल्याचे लासलगाव येथील कोविड उपचार केंद्राचे प्रमुख डॉ. राजाराम शेंद्रे यांनी सांगितले.निफाड तालुक्यातील कोळवाडी येथील दोन, निफाड येथील तीन, शिवरे येथील एक, खेरवाडी येथील तीन, पिंपळस रामाचे येथील एक, लासलगाव येथील एक व सायखेडा येथील दोन अशा अठरा रुग्णांची कोरोनामुक्तीनंतर घरवापसी आनंदाने टाळ्या वाजवून करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी राजाराम शेंद्रे, डॉ. बाळकृष्ण अहिरे, प्रमुख आरोग्यसेविका सविता जाधव, पाटेकर सिस्टर, दिलीप जेऊघाले, विजयकुमार पाटील, राजू जाधव, गणेश भवर, प्रकाश गुळवे, ज्ञानेश्वर शिंदे, दत्तू शिंदे, संतोष निरभवणे, घनश्याम माठा आदी उपस्थित होते.
लासलगाव केंद्रातून १८ कोरोनामुक्त रुग्णांची घरवापसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 12:04 AM