शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

मनमाड शहरात आठ रुग्णांची घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 9:10 PM

मनमाड : येथील सेंट झेवियर्स शाळेतील कोरोना उपचार केंद्रात दाखल असलेल्या एकाच कुटुंबातील सात जणांसह आठ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले. कोरोनाशी लढा देणाऱ्या या रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.

मनमाड : येथील सेंट झेवियर्स शाळेतील कोरोना उपचार केंद्रात दाखल असलेल्या एकाच कुटुंबातील सात जणांसह आठ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले. कोरोनाशी लढा देणाऱ्या या रुग्णांना पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.मनमाड शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. शहरातील तीन कुटुंबात आढळलेल्या अनेक रुग्णांमुळे प्रशासनाची धावपळ उडाली. या सर्व रु ग्णांवर सेंट झेवियर्स शाळेतील कोविड सेंटरमध्ये उपचार करण्यात येत आहे. शनिवारी या केंद्रातील आठ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा समावेश आहे. निमोण चौफुली परिसरात राहणाºया या कुटुंबातील दोन पुरुष, दोन महिला व तीन बालकांनी कोरोनाला हरविले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी पुष्पगुच्छ देऊन या रुग्णांना शुभेच्छा दिल्या. सर्वांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच सजग राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कोरोना केंद्रप्रमुख डॉ. संतोष जगताप, नोडल अधिकारी डॉ. रवींद्र मोरे, डॉ. जयश्री सुर्वे, साधना शिंदे, एकनाथ बनसोडे, महेश देशमुख, विशाल वाघ, अभिजित त्रिभुवन आदी उपस्थित होते.दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मनमाड येथील गुरुद्वारा प्रशासनाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन गुरुद्वाराचे मुख्य प्रबंधक बाबा रणजित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. शासन व प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर व मास्कवापरून रक्तदान करण्यात आले. यावेळी गुरदीप सिंग, सुरजित कांत हरदीप सिंग चावला, परविंद सिंग ठकराल, सतपाल सिंग कांत, शिवसेनेचे प्रवीण नाईक, संतोष बळीद, संजय कटारिया, बलबीर सिंग कांत, रणजित सिंग, जसरविंदर सिंग ठकराल उपस्थित होते.--------------------------------------मनमाडची बाजारपेठ सम विषम पद्धतीनेमनमाड : शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्यासाठी ८ जूनपासून अनलॉक एकमधील तिसरा टप्पा सुरू करण्यात आला असून, त्याअंतर्गत शहरातील दुकाने एक दिवसाआड एका बाजूने उघडण्यात येणार आहे. त्यानुसार शहराची बाजारपेठ यापुढे सम-विषम पद्धतीने सुरू राहील. या आदेशाची अंमलबजावणी सोमवार १५ जूनपासून अमलात येत असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी दिली.

टॅग्स :Nashikनाशिक