नाशिक : नाशिकस्थित आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करून आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी महाविद्यालयांसाठी नागपूरला स्वतंत्र आयुष विद्यापीठ स्थापन करण्याच्या जोरदार हालचाली शासनस्तरावरून सुरू असताना राज्यातील होमिओपॅथी महाविद्यालयांनी मात्र आपण आरोग्य विज्ञान विद्यापीठासोबतच राहणार असल्याची भूमिका घेतली आहे. यासंदर्भातील पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविल्याने आयुष स्थापनेचा आटापिटा करणाऱ्यांना हा धक्का मानला जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात होमिओपॅथी महाविद्यालयांनी स्पष्ट शब्दात नकार देत आंतरविद्या शाखांच्या विकासाला यामुळे खीळ बसणार असून, शासनाच्या मूळ हेतूला तडा जाण्याचा हा प्रकार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना ज्या उद्देशाने करण्यात आली त्यानुसार सर्व पॅथींच्या विकास आणि संशोधनासाठी अनेक अभ्यासक्रम, करार आणि उपक्रम राबविले आहेत. अनेक संशोधने हे दृष्टिपथात असून, आंतर विद्याशाखांच्या विकासाला चालना मिळण्यास सुरुवात झाली आहे.
‘आयुष’सोबत जाण्यास होमिओपॅथीचा नकार
By admin | Published: February 02, 2016 12:03 AM