लासलगाव : येथील आय आय एफ एल गोल्ड लोण बॅँकेतील कर्मचाºयाने साडे चार लाख रूपयांचा बेअरर धनादेश परत करत प्रामाणिकपणाचा एक आदर्श घालून दिला. सांगवी भुसार येथील रहिवासी ब्रह्मानंद जाधवहे लासलगाव येथील आय आय एफ एल गोल्ड लोण या बँकेतील कर्मचारी आहेत. जाधव हे मंगळवारी सकाळी बँकेत कामावर येत असतानाच त्यांना बँकेच्या आवारात साडेचार लाखाचा बेअरर धनादेश सापडला. ही घटना त्यांनी त्यांच्या बँकेचे अधिकारी राजेंद्र होळकर व समीर पठाण यांना सांगितली. हा बेअरर धनादेश एच डी एफ सी बँकेचा आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी आजूबाजूच्या परिसरात या धनादेशाबद्दल विचारपूस केली परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. थोड्याच वेळात प्रदीप पालीवाल ही व्यक्ती या ठिकाणी हजर झाल्यावर हा धनादेश त्यांचा असल्याचे लक्षात आल्यावर सदर व्यक्तीचे बँक खाते व ओळखपत्र तपासून त्याची शहानिशा केल्यावर त्या व्यक्तीस सदर धनादेश परत देण्यात आला. या वेळी बँकेचे अधिकारी राजेंद्र होळकर, व्यापारी प्रदीप पालीवाल, दिनेश प्रजापती, बँक कर्मचारी अमित कंकरेंज, कल्पेश खेरु ड, संदीप डांगळे उपस्थित होते. या बँक कर्मचाºयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
बँक कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, साडेचार लाखांचा धनादेश केला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 2:01 PM