येवला : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर येथील यमाई मातेच्या दर्शनासाठी कोजागरी पौर्णिमेला लाखो भाविक येत असतात. येवला येथील जय यमाई भक्त परिवारानेकनेरसर येथे सदिच्छा भेट दिली.याप्रसंगी कनेरसर येथे यमाई माता मंदिरावर मोठा ध्वज मध्यरात्री १२ वाजता लावण्यात आला. तसेच कनेरसर येथे पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यामध्ये येवल्यातील यमाई भक्त परिवार यांना पालखीचा मान मिळाला व महाआरतीही त्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी यमाई माता ट्रस्ट विश्वस्त मंडळाचे जनसंपर्कअधिकारी दादासाहेब नाईकर, अध्यक्ष मोहन दौंडकर, सहखजिनदार बबनराव दौंडकर, सचिव मच्छींद्र दौंडकर यांच्या हस्ते येवला येथील यमाई माता भक्त परिवाराचे पदाधिकारी मुकेश लचके, पांडुरंग खंदारे, राम तुपसाखरे, राहुल सुताणे, कैलास बकरे यांचा सत्कार करण्यात आला.‘सर्वात मोठा ध्वज’ येवला येथील जय यमाई माता भक्त परिवारातर्फेलावण्यात आला. त्या ध्वजावर यमाई माता ही अक्षरे सोनेरी रंगाच्या लेसने रेखाटली होती. यामुळे येवल्याची कला देवीच्या चरणी पोहोचली. ध्वजाची कलाकुसर मुकेश लचके यांनी केली होती.
येवल्यातील यमाई भक्तांना ध्वजाचा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 1:15 AM