पेठ : पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय स्वच्छता महोत्सव अंतर्गत स्वच्छ भारत अभियान उपक्र मात उत्कृष्ट कार्य करणाºया सरपंच, ग्रामसेवक व स्वच्छाग्रही यांना सन्मानीत करण्यात आले.जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महोत्सवात तालुक्यातील धानपाडा, जांबविहीर, हातरूंडी, खोकरतळे, कापुर्ण, रानविहीर,घनशेत, बाडगी, आंबे, हनुमाननगर या ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला.गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी सभापती पुष्पा गवळी, उपसभापती तुळशिराम वाघमारे, सदस्य विलास अलबाड, गटविकास अधिकारी अनिल नागणे, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे, विस्तार अधिकारी बी. एस. पवार, पी. सी. पाडवी, बी. एस.सादवे, तालुका समन्वयक प्रकाश भुसारे, रवि सहारे यांच्यासह विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आर. डी. शिंदे यांनी सुत्रसंचलन तर बापू सादवे यांनी आभार मानले.स्वच्छता कार्यशाळेत स्वच्छाग्रहीना प्रशिक्षणस्वच्छ भारत कक्षाचे जिल्हा प्रतिनिधी राजेश मोरे यांनी तालुक्यातील स्वच्छाग्रही व सरपंच- ग्रामसेवक यांना शासन निर्णयानुसार करायवयाची कार्यवाही व करावयाच्या उपाययोजनाबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन केले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावपातळीवर काम करणाºया स्वच्छागृहींना साहित्य वाटप करण्यात आले. पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून समजून देण्यात आले. यावेळी तालुक्यातील जलसुरक्षक, लाभार्थी उपस्थित होते.पेठ येथे स्वच्छता महोत्सव गौरव समारंभ प्रसंगी उपस्थित भास्कर गावीत, पुष्पा गवळी, तुळशिराम वाघमारे, विलास अलबाड, अनिल नागणे, अमित भुसावरे,राजेश मोरे आदी.
स्वच्छ भारत अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवक सरपंचांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 4:47 PM
पेठ : पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद नाशिक व पंचायत समिती पेठ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय स्वच्छता महोत्सव अंतर्गत स्वच्छ भारत अभियान उपक्र मात उत्कृष्ट कार्य करणाºया सरपंच, ग्रामसेवक व स्वच्छाग्रही यांना सन्मानीत करण्यात आले.
ठळक मुद्देप्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला.