जिल्हा परिषदेच्या परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून बांधलेल्या ७५ हजार लीटर क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण आमदार बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले, तर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कोरोना योद्धा सन्मान सोहळा श्रीराम मंदिर सभागृहात पार पडला. अध्यक्षस्थानी सरपंच जिजाबाई पवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील, माजी जि.प. सदस्य प्रशांत बच्छाव, बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे, शेतकरी मित्र बिंदूशेठ शर्मा, विस्तार अधिकरी नितीन देशमुख आदी उपस्थित होते. कोरोनाच्या काळात विविध माध्यमांतून समाजसेवा करणाऱ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला. बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे यांनी प्रास्ताविक, तर सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक पंढरीनाथ बोरसे यांनी केले. यावेळी उपसरपंच सुशीलकुमार सोनवणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य विजयसोनवणे, डॉ.सुधीर सोनवणे, पंकज बधान, सोपान सोनवणे, बंधाटेचे सरपंच नंदू बैरागी, रवींद्र सोनवणे, कडू सोनवणे, राजेंद्र परदेशी आदी उपस्थित होते
इन्फो
-....यांचा झाला गौरव
कोरोना योद्धा म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे सर्व कर्मचारी, डॉ.जगदीश चौरे, पोलीस हवालदार प्रकाश जाधव, जगजीतसिंह सोळंकी, निवृत्ती भोये, ज्येष्ठ पत्रकार हेमंत चंद्रात्रे, पत्रकार नीलेश गौतम, खासगी वैद्यकीय व्यावसायिक डॉ.प्रदीप खैरनार, डॉ.राहुल गायकवाड, तलाठी आतष कापडणीस, हिरालाल बाविस्कर, संतोष दुसाने, विशाल नेरकर, सुनील वाघ, आरोग्यसेविका अलका आहेर, हर्षद सोनवणे आदींचा प्रशस्तिपत्र देऊन कोरोना योद्धा म्हणून गौरव करण्यात आला.
फोटो - ०५ डांगसौंदाणे कोरोना
डांगसौंदाणे येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जगदीश चौरे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करताना बागलाणचे आमदार दिलीप बोरसे. समवेत बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे, बिंदूशेठ शर्मा, सरपंच जिजाबाई पवार आदी.
===Photopath===
050621\05nsk_12_05062021_13.jpg
===Caption===
फोटो - ०५ डांगसौंदाणे कोरोना डांगसौंदाणे येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश चौरे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करताना बागलाणचे आमदार दिलीप बोरसे. समवेत बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे, बिंदूशेठ शर्मा, सरपंच जिजाबाई पवार आदी.