देवगाव : गेल्या एक ते दीड वर्षांपासून कोरोना विषाणूची तमा न बाळगता झटणारे फ्रंटलाईन कोविड योद्ध्यांचा सन्मान श्रमजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आला.
श्रमजीवी संघटनेच्या सर्वेसर्वा विद्युलता पंडित यांच्या प्रेरणेतून तालुक्यातील विविध ठिकाणी कोरोना काळात आपली सेवा देणाऱ्या पत्रकार, भाप्रसे सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना आदिवासी विकास विभाग, इगतपुरी त्र्यंबकेश्वर उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांचा शुक्रवार दि. ९ जुलै रोजी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी श्रमजीवी संघटनेच्या वतीने श्रमजीवी संघटनेचे जि. उपाध्यक्ष शिवाजी दराणे, जिल्हा युवा कार्याध्यक्ष संतोष निरगुडे प्रसिद्धी प्रमुख अंकुश मधे, सहसचिव नवसू गारे, माजी जिल्हा युवक प्रमुख सुनील बांगारे, कातकरी प्रमुख पांडुरंग पालवे, प्रकाश खाडे आदी श्रमजीवीचे पदाधिकारी उपस्थित होते.