नाशिक : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये आॅनलाइन नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्ह्याला देशपातळीवर प्रथम पुरस्कार, तर एकूण सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करून ९६.३३ एवढे गुण मिळविल्याबद्दल पश्चिम विभागात तिसºया क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री उमा भारती यांच्या हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी हा सन्मान स्वीकारला.आॅगस्ट महिन्यात देशभरात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ करण्यात आले होते. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतींची केंद्रस्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली होती. त्यात नाशिक जिल्ह्याचे काम उत्कृष्ट असल्याने तसेच केंद्र सरकारने विकसित केलेल्या मोबाइल अॅप एसएसजी २०१८ द्वारे देशात सर्वाधिक दोन लाख २२ हजार ५५१ प्रतिक्रिया नाशिक जिल्ह्याने नोंदविल्याने महाराष्टÑ शासनाकडून औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्ह्यांचा सन्मान करण्यात आला होता. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या गुणांकनातही जिल्ह्णाच्या या कामगिरीची दखल घेण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ अंतर्गंत शौचालय उपलब्धता व वापर, कचºयाचे व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, जाणीव जागृती, स्वच्छतेचे प्रमाण, हागणदारीमुक्त गावाची टक्केवारी आणि पडताळणी, सार्वजनिक जागेवरील स्वच्छतेचे निरीक्षण, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, बाजाराची ठिकाणे, मंदिरे-जत्रास्थळे, घनकचरा व्यवस्थापन आदी मुद्द्यांवर आधारित सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात नाशिक जिल्ह्णाला तिसºया क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. सातारा जिल्हा प्रथम तर गुजरातमधील पाटण जिल्हा द्वितीय पुरस्काराचा मानकरी ठरला. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, केंद्रीय प्रधान सचिव परमेश्वर अय्यर, राज्याचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल आदी उपस्थित होते. पोषण आहारातही नाशिक.अव्वलसप्टेंबरपासून सुरू झालेल्या पोषण आहार अभियानांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपक्रम राबविण्यात आले आहेत. या अभियानात नाशिक जिल्हा देशात अग्रेसर आहे. पोषण आहार अभियानातील उत्कृष्ट कामगिरीबाबत मंगळवारी शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागाच्या वतीने पोषण आहार अभियानाची सांगता झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते नाशिक जिल्ह्याचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे, प्रमोद पवार यांनी हा सन्मान स्वीकारला.
नाशिक जिल्हा परिषदेचा दिल्लीत सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 1:26 AM
नाशिक : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण या देशव्यापी सर्वेक्षणामध्ये आॅनलाइन नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यात नाशिक जिल्ह्याला देशपातळीवर प्रथम पुरस्कार, तर एकूण सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी करून ९६.३३ एवढे गुण मिळविल्याबद्दल पश्चिम विभागात तिसºया क्रमांकाचा पुरस्कार केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री उमा भारती यांच्या हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी हा सन्मान स्वीकारला.
ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षण : पश्चिम विभागात तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार