चांदवड : येथील विश्वसंकल्प प्रतिष्ठान बहुउद्देशीय सामाजिक ब्राह्मण संस्थेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व पालकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अथर्व चौबे (९८ टक्के), प्राजक्ता गोखले (९४ टक्के), वेदश्री दीक्षित (९३ टक्के), योगिता जोशी तसेच दीपक जोशी, अथर्व जोशी, मोहित गोऱ्हे आदींचा गुणगौरव व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.संस्थेचे शेखर पाठक यांनी यावेळी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्रवीण गोऱ्हे, दिलीप चौबे, स्मिता घमंडी, सुप्रिया वैद्य उपस्थित होते. चांदवड शहरातील ज्येष्ठ पुरोहित नारायण कार्लेकर व अरुण दीक्षित यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन ॲड. अभिलाषा दायमा यांनी, तर आभार नीलेश धर्माधिकारी यांनी मानले.यावेळी श्रीकृष्ण वैद्य, महेश दांड, सचिन पाठक, ॲड. सचिन कुलकर्णी, भूषण वैद्य, किरण कुलकर्णी, पंडित मिश्र, संजय ओझा, किशोर दीक्षित, पांडुरंग दीक्षित, ऋषिकेश दायमा, भूषण दीक्षित, नम्रता जोशी, गायत्री दीक्षित, सारिका वैद्य, मनीषा वैद्य, प्रियंका हरदास, सारिका दीक्षित, नीता चौबे, उज्ज्वला चौबे, अश्विनी धर्माधिकारी, ॲड. कल्याणी कुलकर्णी, आरती दीक्षित, पूजा दीक्षित आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन किशोर हरदास, अमोल दीक्षित यांनी केले.(२७ चांदवड)
ब्राह्मण संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 7:49 PM