व्यासपिठावर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल सरवार, किरण भावसार, डॉ. वैष्णवी नेहे आदींसह महिला गृहउद्योगाच्या संचालक उपस्थित होत्या. यावेळी तालुक्यातील २५ कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात आला. प्रारंभी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवनांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिंदेवाडी येथील शहीद जवान केशव गोसावी यांचे वीरपिता सोमगिर गोसावी यांना पाच हजार रूपये मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. महिलांचा गौरव करताना नायगावकर यांनी आपल्या मिश्किल व खुमासदार शैलीने उपस्थिताना हसवले. नोकरी करणारी पत्नी दर महिन्याला पगाराच्या रूपाने घरात हुंडा घेवून येते असे सांगत हुंड्याच्या प्रथेवर त्यांनी ताशेरे ओढले. स्वयंपाक घरात होणाऱ्या भाज्यांची कापाकाप, अंब्याची पिळवणुक, दह्याला फासावर लटकविणे आदी विनोदाची फोडणी देत भाज्यांची कविता सादर केली. डॉ. नेहे यांनी महिलांना आरोग्यविषयी मार्गदर्शन केले. रूपाली डिंगोरे यांनी प्रास्तविकात महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. रोहिणी मिठे यांनी सूत्रसंचालन केले. मंगला साबळे यांनी आभार मानले.
सिन्नर तालुक्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 5:42 PM