अभोणा - हुषारी, कस्टाळूवृत्ती, सहनशिलता यामुळे सर्व क्षेत्रात महिला आपले कर्तुत्व गाजवित आहे. असे प्रतिपादन प्रा.डॉ.उर्मिला गिते यांनी केले.डांग सेवा मंडळाच्या अभोणा कला महाविद्यालयात महिला सक्षमीकरण या विषयावर झालेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. प्रदिप देशपांडे यांनी महिलांच्या विविध क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एस.आर. निकम यांनी केले. यावेळी अभोणा परिसरातील कर्तबगार महिलांचा भेटवस्तु देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्र मास संस्थेचे उपाध्यक्ष शंकरराव मराठे, सरपंच मीराताई पवार, ताराबाई पवार, शेखर जोशी यांचेसह प्रा.डी.ए.सोनवणे, जी.डी.रूपवते, डी.जे.नेर पगार, रविंद्र पगार, बी.जी.बोरसे, लता बागुल, अशोक काटे, किसन बागुल आदी सह विद्यार्थीनी व महिला उपस्थित होते. प्रा.किशोर पवार यांनी सूत्रसंचालन केले.
कर्तबगार महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 5:32 PM