कळवण: दि कळवण मर्चट को आॅप बॅकेने इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारु न कमको स्कॉलर पुरस्काराने गुणवंताना सन्मानित करत कमको लोकमान्य गणेशोत्सव स्पर्धेत आदर्श सोशल गुपला लोकमान्य पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.कमको बॅकेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान सोहळा बॅकेचे अध्यक्ष प्रवीण संचेती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार कैलास चावडे, उपजिल्हारु ग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ लोंढे, पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, आदर्श शिक्षक योगेश सुर्यवंशी, पंकज दशपुते , नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ सचीन पटेलकमकोचे माजी अध्यक्ष सुनील महाजन, कमको उपाध्यक्ष सौ शालिनी महाजन, जनसंपर्क संचालक डॉ धर्मराज मुर्तडक आदी मान्यवर उपस्थित होते.गुणवंत विद्यार्थी गौरव व गणेशोत्सव उत्कृष्ट सजावट करणारया गणेश मंडळ पुरस्कार वितरणप्रसंगी बोलताना तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले की गणेशोत्सवाचा समाजप्रबोधनाचा मूळ उद्देश कुठे तरी हरवून चालला आहे. गणेशोत्सवातून जो सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोचायला हवा तो पोचत नाही. आर्थिक सुबत्ता असली तरी वैचारिक सुबत्ता महत्वाची असल्याने गणेशोत्सव हा सामाजिक बांधिलकीचा सण आहे हे लक्षात घेऊन कमको बॅकेने समाज संघटन व सामाजिक बांधिलकीतून कमको स्कॉलर पुरस्कार व कमको लोकमान्य गणेशोत्सव स्पर्धा हे उपक्र म स्तृत्य व कौतकास्पद असल्याचे मत तहसीलदार चावडे यांनी व्यक्त केले.यावेळी कळवण तालुक्यातील 112 गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह , प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम क्र मांक आदर्श सोशल गुपने तर द्वितीय क्र मांक कृष्णा फ्रेंडस सर्कलने तर कळवणचा राजा यंगस्टार युनायटेड सेव्हनने तृतीय क्र मांक मिळविला.महाराज युवा फाऊंडेशन , महाराजा कला व क्रि डा सांस्कृतिक मित्र मंडळ, गांधी चौक मित्र मंडळ, श्रीमंत योगी प्रतिष्ठान व ओम गणेश मित्र मंडळ यांना उत्तेजनार्थ तर साई गणेश मित्र मंडळ अभोणा यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.प्रास्ताविक प्रा निंबा कोठावदे , सूत्रसंचलन योगेश मालपूरे, आभार राजेंद्र अमृतकार यांनी मानलेकार्यक्र मास कमकोचे संचालक गजानन सोनजे, नितीन वालखडे, योगेश मालपूरे, राजेंद्र अमृतकार, प्रा निंबा कोठावदे, पोपटराव बहीरम, सौ भारती कोठावदे , प्रभाकर कोठावदे, गालिब मिर्झा, स्वीकृत संचालक देवीदास मालपुरे, देवीदास कोठावदे, संजय महाजन, देवीदास विसपूते, उदय नावरकर, सुनील महाजन, तुषार मालपूरे, धिरज कोठावदे, भगवान बिरारी, रमेश दशपुते, गंगाधर सोनवणे, प्रकाश कालावडीया, बाळासाहेब वराडे, सुरेश येवला , संदीप शिरसाठ, यशवंत सुर्यवंशी, सुरेश सोनजे , सुनील मुसळे, राहूल बिरार, संजय वेढणे आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 4:29 PM
कळवण: दि कळवण मर्चट को आॅप बॅकेने इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारु न कमको स्कॉलर पुरस्काराने गुणवंताना सन्मानित करत कमको लोकमान्य गणेशोत्सव स्पर्धेत आदर्श सोशल गुपला लोकमान्य पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.कमको बॅकेच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान सोहळा बॅकेचे अध्यक्ष प्रवीण संचेती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
ठळक मुद्देकळवण: दि कळवण मर्चट को आॅप बॅकेचा उपक्रम