सिन्नर : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या मातोश्री व चांडक कन्या विद्यालयाच्या प्राजक्ता वाघ, मधुरा सानप, वैष्णवी कंकरेज, सिद्धी कुलकर्णी या विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून यशस्वी झाल्या. या विद्यार्थिनींचा विद्यालयात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यालयात यावर्षी एकूण १५६ विद्यार्थिनी परीक्षेस प्रविष्ट झाल्या होत्या. प्रविष्ट झालेल्या विद्यार्थिनींपैकी सर्व विद्यार्थिनी एसएससी परीक्षेस उत्तीर्ण झाल्या. चांडक कन्या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींपैकी ९१ विद्यार्थिनी विशेष श्रेणीत, ५५ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत आणि १० विद्यार्थिनी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. प्राजक्ता संजय वाघ (१०० टक्के), मधुरा दिलीप सानप (१०० टक्के), वैष्णवी सुनील कंकरेज (१०० टक्के), सिद्धी किशोर कुलकर्णी (१०० टक्के), अक्षदा किरण गाडे (९९ टक्के), ऋतुजा किशोर पानेकर (९८.८०) यांनी विशेष यश संपादन केले. शालेय समिती अध्यक्ष श्रीराम क्षत्रिय, मुख्याध्यापिका श्रीमती रेखा हिरे, पर्यवेक्षक चंद्रभान कोटकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
----------------------
फोटो ओळी- सिन्नर येथील मातोश्री चांडक कन्या विद्यालयातील दहावीच्या परीक्षेत विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी श्रीराम क्षत्रिय, रेखा हिरे, चंद्रभान कोटकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थिनी. (३० सिन्नर एसएससी)
300721\30nsk_6_30072021_13.jpg
३० सिन्नर एसएससी