नाशिक : राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर संस्कारातून स्वराजाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचप्रमाणे, देशासाठी लढणाऱ्या शाहीद जवानांच्या वीरमाता आणि वीरनारी यांचेही योगदान मोलाचे असून, क्रीडाक्षेत्रातील क्षितिजे पादाक्रांत करून देशाचे नाव उंचविणाऱ्या खेळाडूंच्या यशात त्यांच्या मातांचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले.कालिका मंदिर देवी ट्रस्ट, क्रीडा साधना संस्था आणि डी.एस.फाउंडेशनतर्फे मंगळवारी (दि.१२) राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त १६ वीरमाता आणि वीरनारी आणि २८ शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या मातांचा आयुक्त कैलास जाधव व जिल्हा क्रिडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मविप्रचे संचालक नाना महाले, कालिका देवी मंदिर ट्रस्टचे खजिनदार सुभाष तळाजिया, क्रीडा संघटक अशोक दुधारे उपस्थित होते. कर्तृत्ववान मातांचा सन्मान करण्याचा उपक्रम प्रशंसनीय असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान, विजया दुधारे यांनी राजमाता जिजाऊ यांच्यावर रचलेली कविता सादर केली. प्रास्तविक आनंद खरे यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश खैरनार यांनी केले. यावेळी नितीन हिंगमिरे, अविनाश ढोली, शशांक वझे, विक्रम दुधारे आदी उपस्थित होते.सत्कारार्थी महिला जीजाबाई धोंगडे, मीनाक्षी कुलकर्णी, वैशाली वायदंडे, लीलाबाई जाधव, कृष्णाबाई बोडके, बाळूबाई सोनावणे, बब्बुबाई ढाकणे, रेखा खैरनार, कल्पना रौंदळ, भारती पगार, सुषमा मोरे, रूपाली बच्छाव, कमल लहाने, सुवर्णा निकम, भरती चौधरी, यशोदा गोसावी, आशा सोनजे, अर्चना निकम, निर्णयाला ठाकरे, भागबाई दराडे विजया दुधारे, विमल तांबे, आशाबाई कडाळे, देविका महाजन, मीना आथरे, विजया दुधारे, हिराबाई घोलप, उज्ज्वला जाधव, संगीता पोहरे, चंपावती देशमुख, जिजाबाई पाटील, भारती जाधव, आशा मुर्तडक.
वीरमातांसह खेळाडू मातांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 12:50 AM
राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर संस्कारातून स्वराजाची मुहूर्तमेढ रोवली. त्याचप्रमाणे, देशासाठी लढणाऱ्या शाहीद जवानांच्या वीरमाता आणि वीरनारी यांचेही योगदान मोलाचे असून, क्रीडाक्षेत्रातील क्षितिजे पादाक्रांत करून देशाचे नाव उंचविणाऱ्या खेळाडूंच्या यशात त्यांच्या मातांचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले.
ठळक मुद्देगौरव : राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य