शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

नाशकात वाढत्या थंडीसोबत रंगतायेत हुरडा पार्टीचे बेत, रब्बी हंगामात ज्वारीसोबतच गहू, हरभरा पिकांचाही होतो हुरडा

By नामदेव भोर | Published: December 11, 2017 1:56 PM

नाशिक परिसरातील शेतशिवारासह आसपासच्या कृषी पर्यटन केंद्रांवर रंगू लागले आहेत. वाढत्या थंडीसोबतच पाहूण्यांसाठी हुरड्याच्या खास बेतापासून कृषी पर्यटन केंद्रांवरील हुरडा पार्टीपर्यंत ठिकठिकाणी हुरड्याची रंगत वाढत असून या माध्यमातून कृषी पर्यटन व्यवसायालाही चालना मिळत आहे.

ठळक मुद्देनाशकात खास हुर्ड्यासाठी ज्वारीचे पीक घेणारे शेतकरीवाढत्या थंडीसोबतच पाहूण्यांसाठी हुरड्याच्या खास बेतशेतकऱ्यांकडून ज्वारी विकत घेऊन हुरडय़ाचे नियोजन गरमगरम हुरडा गुळासोबत चाखण्यासाठी खवय्ये जागवताय रात्र

नाशिक : गोवऱ्यांची, लाकडांची पेटलेली शेकोटी, त्यातील निखाऱ्यांवर खरपूस भाजलेली ज्वारीची कोवळी दाणेदार कणसे आणि मग हातावर किंवा दगडावर कणीस घुसळल्यानंतर तयार होणारा गरमगरम हुरडा गुळासोबत चाखत जागवलेली रात्र, असे चित्र नाशिक परिसरातील शेतशिवारासह आसपासच्या कृषी पर्यटन केंद्रांवर रंगू लागले आहेत. वाढत्या थंडीसोबतच पाहूण्यांसाठी हुरड्याच्या खास बेतापासून कृषी पर्यटन केंद्रांवरील हुरडा पार्टीपर्यंत ठिकठिकाणी हुरड्याची रंगत वाढत असून या माध्यमातून कृषी पर्यटन व्यवसायालाही चालना मिळत आहे.ज्वारीचे पीक प्रामुख्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात घेतले जात असले तरी नाशकातील थंडीच्या पार्श्वभूमीवर परिसारतील कृषी शिवारासह विविध कृषी पर्यटन केंद्रांवर खास हुर्ड्यासाठी ज्वारीचे पीक घेणारे शेतकरी आहे. सध्या रब्बी ज्वारीचे पिक अंतिम अवस्थेत आहे. कणसात दाणे भरण्यास सुरवात झाल्यानंतर दुधाळ दाणे हिरवे होवून भरु लागले की त्याला ज्वारी हुरड्यात आली असे म्हणतात. दुधाळ दाणे ते निब्बर दाणे या दोन्हींच्या मधली थोडी कच्चीपक्की अशी ही अवस्था असते. या अवस्थेतील टपोरी कणसे हुरड्यासाठी निवडली जातात. ताटावरुन कणसे खुडताना त्यांचा दांडा लांब ठेवला जातो. लांब दांड्यामुळे कणीस विस्तवात भाजायला सोपे जाते. हुरड्यासाठी विशिष्ट पद्धतीने शेकोटी तयार केली जाते. वाऱ्यापासून संरक्षण आणि निखारे जास्त वेळ फुलत रहावेत म्हणून शेतातच खड्डा खणून त्यात गोवऱ्या पेटविल्या जातात. अनेक ठिकाणी गोवऱ्यांसोबत लाकडांचाही वापर केला जातो. जाळ संपल्यानंतर निखाऱ्यात ही कणसे खुपसण्यात येतात. तर काही ठिकाणी कोळशाच्या शेगडय़ांचाही वापर हुरडय़ासाठी वापर केला जातो.

चारही बाजूने चांगला ताव बसण्यासाठी कणसे वेळोवेळी फिरवतात आणि मग चांगली खरपूस भाजलेल्या कणसांचे दाणे म्हणजेच हुरडा काढण्यासाठी ती तळहात किंवा दगडावर रगडतात. दाण्यांवरील कण्या निट निघाल्या नाहीत तर घशाला त्रस देतात. यामुळे कणसे रगडण्याची कला हुरडा तयार करण्यात सर्वाधिक महत्वाची समजली जाते. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रासह आता नाशिकमध्येही विविध ठिकाणी हुरडा पार्टीची परंपरा रुजत असून अनेकांनी या हुरडा पाटर्य़ाना व्यवसायिक स्वरुपही दिले आहे. 

गहू, हरभराऱ्याचाही हुरडारब्बी हंगामाच्या ज्वारीबरोबरच गहू व हरभरा या दोन्ही पिकांचाही हुरडा केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी त्यास वेगवेगळी नावे असली तरी सर्वसाधारणपणे गव्हाच्या हुरड्याला ओंब्यांचा हुरडा व हरभऱ्याच्या हुरड्याला हुळा म्हटले जाते. बाजरीच्या हुरड्याला निंबूर हे खास नाव आहे. अनेक ठिकाणी हरभऱ्याचा हुळा करुन वर्षभर खाण्यासाठी साठवून ठेवला जातो. ज्वारीबरोबरच सध्या अनेक ठिकाणी हरभरा ही हुरड्याच्या अवस्थेत असून गव्हाची ओंबी भरण्यासही सुरवात झाली आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात संक्रातीपूर्वी हुरडा पार्ट्यांमध्ये ओंब्यांच्याही समावेश होऊ लागणार आहे. त्यामुळे हुर्डा पाटर्य़ाचा हा हंगाम किमान दीड ते दोन महिने तरी चांगलाच रंगणार अलल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

हुरड्याचाही बदलतोय ट्रेन्डगेल्या आठ ते दहा वर्षात अनेक ठिकाणच्या पारंपरिक ज्वारीच्या पट्ट्यातून हे पिक हद्दपार झाल्याची स्थिती आहे. या पिक बदलाचा परिणाम हुरड्याचा ट्रेन्ड बदलण्यावरही झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी ज्वारीचे उत्पादन घेणो बंद केले असले तरी हुरड्यापुरती ज्वारी उत्पादन किंवा इतर ठिकाणांहून आणण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे अनेक कृषी पर्यटन केंद्र परिसरातील शेतकऱ्यांकडून ज्वारी विकत घेऊन हुरडय़ाचे नियोजन करतात. तर काही ज्वारीचे पीक घेणारे शेतकरी स्वत: हुरडा पाटर्य़ाचे नियोजन करून या परंपरेला व्यावयिक स्वरूप देऊ लागले आहेत.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिकFarmerशेतकरीtourismपर्यटन