नांदूरशिंगोटे : परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ तसेच दिवसभरही चांगलीच थंडी जाणवत असल्याने हुडहुडी वाढली असून, परिसर चांगलाच गारठला आहे.येथे व परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा प्रभाव आता जाणवू लागला असून, वातावरणात थंडी चांगलीच वाढल्याची जाणीव होत आहे. त्याचा परिणाम मानवासह पाळीव प्राणी पशु, पक्षी व जनावरांवरही होताना दिसत आहे. येत्या काही दिवसात तापमान अधिक खाली जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. अवकाळी पडलेल्या पावसामुळे थंडी वाढली असून, तापमानात अचानक घट झाल्याने नागरिक दिवसभरही उबदार कपडे घालून घराबाहेर पडताना दिसतात.तसेच परिसरात दिवसभर वातावरणात बदल झाल्याने ऊन व सावलीचा खेळ अनुभवयाला मिळत आहे. ग्रामीण भागात सकाळी व संध्याकाळी ठिकठिकाणी शेकोटीपासून ऊब मिळण्याचा प्रयत्न नागरिक करताना दिसत आहेत. दिवसभर वाऱ्याचे प्रमाण खूप आहे. थंडीचा जोर वाढल्याने परिसरातील दुकानात उबदार कपड्यांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. वातावरणातील बदलामुळे मानवी शरीरावर होणारा परिणाम दिसत आहे. परिसरात गेल्या आठवड्यापासून असलेले ढगाळ वातावरण व त्यात थंडीचा कडाका यामुळे जनजीवन विस्कळीत होत असून, बदलत्या हवामानाचा परिणाम गहू, हरभरा पिकावर होताना दिसत आहे.शेतकरीवर्ग धास्तावलानवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच वातावरणात अचानक बदल होऊन गारवा निर्माण झाला आहे. तसेच पहाटेच्या वेळेस दव पडत असल्याने रब्बीच्या पिकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. विचित्र हवामानामुळे शेतकरीवर्ग धास्तावला आहे.
नांदूरशिंगोटे परिसरात हुडहुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 11:55 PM
नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ तसेच दिवसभरही चांगलीच थंडी जाणवत असल्याने हुडहुडी वाढली असून, परिसर चांगलाच गारठला आहे.
ठळक मुद्देशेकोट्यांचा आधार : वातावरणातील बदलाचा पिकांना फटका