पाटोदा : तालुक्यातील शेतकर्यांच्या पाठामागील संकटांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. परतीच्या पावसातून कशीबशी वाचविलेली पिके बदलत्या हवामानामुळे विविध रोगांच्या कचाट्यात सापडली आहेत. तर आता पहाटेच्या वेळी दात धुके पडत असल्याने चेतकर्यांच्या चिंतेत आणखी पर पडली आहे.पाटोदा परिसरात गुरुवारी (दि.19) पहाटे पडलेले दाट धुके तसेच थंडी व दविबंदूमुळे द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकर्यांना हुडहुडी भरली आहे. द्राक्ष पिकांवर डावणी व भुरी तसेच कांदा पिकावर करपा आणि मावा रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे पिके जगविण्यासाठी बुरशीनाशके फवारणी करून महागडी औषधे आणून पिके वाचिवण्याचा आटापिटा शेतकर्यांचा सुरू आहे. उत्पन्न मिळण्याऐवजी शेतकर्याला नुकसानीलाच सामोरे जावे लागत आहे.गेल्या काही दिवसांपासून परिसरात वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोगांनी अतिक्र मण केले आहे. रोग आटोक्यात आणण्यासाठी पिकांवर महागडी औषध फवारणी करावी लागत असल्याने खर्चात वाढ झाली आहे.द्राक्ष पिकावर अळीचा प्रादुर्भावपाटोदा परिसरात पहाटे तीन वाजेपासून दुपारी बारा-साडे बारा वाजेपर्यंत प्रचंड प्रमाणात धुके तसेच थंडी व दविबंदू पडल्यामुळे द्राक्ष व कांदा या पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. तसेच द्राक्ष पिकावर अळीचाही मोठा प्रादुर्भाव झाला आहे. एक संकट दूर करेपर्यंत दुसरे संकट त्याच्यासमोर उभे राहत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
धुक्यामुळे द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 6:38 PM
शेतकर्यांच्या पाठामागील संकटांची मालिका काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. परतीच्या पावसातून कशीबशी वाचविलेली पिके बदलत्या हवामानामुळे विविध रोगांच्या कचाट्यात सापडली आहेत. तर आता पहाटेच्या वेळी दात धुके पडत असल्याने चेतकर्यांच्या चिंतेत आणखी पर पडली आहे.
ठळक मुद्देपिके वाचिवण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा