शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

हुक्का पार्टीप्रकरणी ५२ संशयितांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2022 12:12 AM

इगतपुरी : तालुक्यातील त्रिंगलवाडी येथील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये शनिवारी (दि.१२) ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून रंगलेली हुक्का पार्टी उधळून लावली ...

ठळक मुद्देदोन महिला पोलीस कोठडीत : १८ महिलांची रवानगी वात्सल्य होममध्ये

इगतपुरी : तालुक्यातील त्रिंगलवाडी येथील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये शनिवारी (दि.१२) ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून रंगलेली हुक्का पार्टी उधळून लावली होती. यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ५२ पुरुष व २० महिलांना सोमवारी (दि.१४) इगतपुरी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने यातील ५२ पुरुषांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर देहविक्रीसाठी महिला पुरविणाऱ्या मुंबईतील दोघा महिलांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान, देहविक्रीसाठी आणलेल्या १८ महिलांना वात्सल्य होम प्रोटेक्शनमध्ये ठेवण्याची सूचना न्यायालयाने केली.इगतपुरी तालुक्यातील माऊंटन शॅडो रिसॉर्टमध्ये शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ग्रामीण पोलिसांनी हुक्का पार्टीवर छापा टाकत ५२ पुरुष व १८ महिलांना ताब्यात घेतले होते. रेवती कंपनीच्या हार्डवेअर स्पेअर पार्ट कंपनीतील देशातील प्रत्येक राज्यातील होलसेल डिस्ट्रिब्यूटर असलेल्या ५२ जणांना या पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. पोलिसांना या हुक्का पार्टीची भणक लागल्यानंतर त्यांनी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात पुरुषांसह देहविक्री करणाऱ्या १८ तरुणींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाने ही कारवाई केली होती. संशयितांवर इगतपुरी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार कायदा व सिगारेट तंबाखू मुंबई प्रोव्हिजन ॲक्ट या कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या सर्व संशयितांना इगतपुरी पोलिसांनी सोमवारी दुपारी ३ वाजता इगतपुरी न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकील व संशयितांचे वकील यांच्यामध्ये सायंकाळी उशिरापर्यंत युक्तिवाद झाला. यावेळी यावेळी सरकारी वकिलांनी तीन दिवसाची पोलीस कस्टडी मागणी केली. दरम्यान, सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हा कायदा जामीनपात्र असल्याकारणाने हे गृहित धरून तसेच दारू प्रतिबंधक केस यामध्ये पोलीस कस्टडीची गरज नाही, असा युक्तिवाद संशयितांच्या वकिलांनी केला. न्यायालयाने ५२ संशयितांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली, तर देहविक्रीसाठी महिला पुरविणाऱ्या दोन महिला शिल्पा सिराज कुरेशी व दीपाली देवळेकर रा. मुंबई यांना १६ मार्चपर्यंत चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती सरकारी वकील ॲड. अर्चना महाले यांनी दिली. उर्वरित १८ महिलांना कलम १५ प्रमाणे वात्सल्य होम प्रोटेक्शनमध्ये ठेवण्याचा आदेश देण्यात आला. या तरुणींचे नातेवाईक आल्यावर त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. संशयित आरोपींचे जामीन अर्ज मंगळवारी (दि.१५) न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे संशयितांच्या वकिलांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी