पिंपळगाव बसवंत : शेतकऱ्यांच्या चालत्या ट्रॅक्टर मधून कांदे चोरणे, गोरगरीबांकडून मोबाईल व पैसे हिसकावून घेणे, आठवडे बाजारात महिलांची छेड काढणे, गर्दीत पाकीटमार करून पैशाची लूट करणे, मार्केटमध्ये जाऊन मारहाण करणे, गाळे जाळणे असे अनेक गुंडगिरीचे प्रकार पिंपळगाव शहरात होत असून या संबंधी तक्र ार देणाऱ्यांकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पिंपळगाव बसवंत मध्ये गुंडगिरी पुन्हा वाढल्याचे बोलले उघड जात आहे.ज्यांना गुडांकडून त्रास होतो, त्यांच्या तक्रारी न घेता त्यांच्याकडेच आरोपी म्हणून बघितले जात असल्याने तक्र ार देण्याची हिम्मत होत नाही त्यामुळे खरंच पिंपळगाव शहरात गुंडाराज आहे का? की, पोलिसांच्या भीतीमुळे सर्व सामान्य नागरिक तक्र ार करण्यासाठी घाबरु लागले आहेत.पिंपळगाव बसवंत शहरात काही दिवसांपासून टवाळखोरांकडून विविध गुन्हाचा उगम होत असून नागरिक भयभीत झाले आहे. बस स्थानकावर विद्यार्थीनीची छेड, विद्यार्थीला मारहाण, पाकीटमार, मोबाईल चोरी, मोटारसायकल चोरी यासह टपºयांवर गांजा, बंठा अश्या नशा करणाºया अंमली पदार्थांची विक्र ी सर्रास होत असून पोलिसांना यांचा आर्थिक लाभ मिळत असल्याची प्रतिक्रि या नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगण्यात आलेली आहे.पिंपळगाव बसवंत बाजार समितीत शनिवारी (दि.३०) रात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत असलेल्या तरु णांनी तेथील मजुराला मारहाण करत टॉमेटो गाळाही पेटवण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार घडल्याने बाजार समिती परीसर व पिंपळगाव शहरात पोलिसांची भीतीच राहिली नसल्याचे स्पष्ट होत आहे.चौकट....दारूच्या नशेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न.....अंबिका नगर येथील एका तरु णाने दारूच्या नशेत स्वत:च्या डोक्यात दारूची बाटली फोडली व स्वत:ची नस कापुन घेतली त्याच्यावर खाजगी रु ग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी बेकायदेशीर विकल्या जाणाºया दारू अड्यांवर कारवाई करणे गरजेची आहे.कोट....पिंपळगाव बसवंत शहरात दारू पिऊन काही गुंडप्रवृत्तीचे तरुण सामान्य नागरिकांना मारहाण करतात व त्यांचे मोबाईल व पैसे काडून घेतात जर काहीच नाही मिळाले तर त्यांच्या मालाची नुकसान करतात. त्यामुळे याकडे पोलिसांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे- संतोष गांगुर्डे,पिंपळगाव बसवंत.पिंपळगाव बसवंत शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी संबंधित गुन्हेगारांना कठोर शासन करणे गरजेचे आहे म्हणजे भविष्यात होणार्या गुन्हाना नक्की चाप बसेल- दीपक मोरे, ग्रामपंचायत सदस्य, पिंपळगाव बसवंतफोटो ०१ पिंपळगावबाजार समितीत काही अज्ञात तरुणांनी मजुराला मारहाण करत टमाटो गाळा पेटवण्याचा केलेला प्रयत्न
पिंपळगाव बसवंत शहरात पुन्हा वाढली गुंडगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 6:08 PM
पिंपळगाव बसवंत : शेतकऱ्यांच्या चालत्या ट्रॅक्टर मधून कांदे चोरणे, गोरगरीबांकडून मोबाईल व पैसे हिसकावून घेणे, आठवडे बाजारात महिलांची छेड काढणे, गर्दीत पाकीटमार करून पैशाची लूट करणे, मार्केटमध्ये जाऊन मारहाण करणे, गाळे जाळणे असे अनेक गुंडगिरीचे प्रकार पिंपळगाव शहरात होत असून या संबंधी तक्र ार देणाऱ्यांकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पिंपळगाव बसवंत मध्ये गुंडगिरी पुन्हा वाढल्याचे बोलले उघड जात आहे.
ठळक मुद्देगुंडगिरी पुन्हा वाढल्याचे बोलले उघड जात आहे.