श्वेता खोडे । नाशिक : हिवाळा ऋतू हा खवय्यांसाठी जणू काही पर्वणीच असते. कारण वेगवेगळ्या प्रकारची फळे तसेच भाज्या आदींची रेलचेल या ऋतूमध्ये असते. त्यातच घरगुती भोजनाऐवजी हॉटेलिंग करण्याकडे अनेक मंडळींचा कल वाढतो; परंतु हॉटेलच्या जेवणाऐवजी शहरापासून काही अंतरावर एखाद्या फार्म हाउसवर हुरडाचा बेत आखण्याकडे काही मंडळींचा कल वाढत आहे.वाढत चाललेल्या थंडीमुळे ग्रामीण भागातील जीवनशैलीला अनुसरून हुरडा पार्टीचे आयोजन नाशिक परिसरातदेखील करण्यात येत आहे. गेल्या ८ ते १० वर्षांपासून हुरडा पार्टीचे आयोजन नाशिक परिसरात करण्यात येत आहे.हुरडा पार्टीनिमित्त स्वागतपेय म्हणून उसाच्या रस सोबत पेरू, बोर, आवळा व विविध प्रकारच्या चटण्यांसोबत वेगवेगळ्या प्रकारचा हुरडा असतो. भेळभत्ता, रताळे आणि जेवणामध्ये कांदाभजी, भात यांची मेजवानीही असते. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांनादेखील ग्रामीण भागात असणाऱ्या झोपडी व जेवणातील आहाराची चव चाखता यावी यासाठी हुरडा पार्टीचे आयोजन शहरातील उपनगर भागात करण्यात येते. त्यामध्ये नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढताना दिसत आहे.साहजिकच सायंकाळच्या गारव्यात सूर्यास्ताच्या आकाशातील वेगवेगळ्या रंगांची अनुभूती घेत ठिकठिकाणी हुरडा पार्ट्या रंगू लागल्या आहेत.काही ढाबे आणि हॉटेल वजा फार्म हाउस संचालकांनी हुरडा पार्टीसाठी विशेष आयोजनाची व्यवस्था केली आहे.
गुलाबी थंडीत रंगू लागल्या हुरडा पार्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:50 PM
हिवाळा ऋतू हा खवय्यांसाठी जणू काही पर्वणीच असते. कारण वेगवेगळ्या प्रकारची फळे तसेच भाज्या आदींची रेलचेल या ऋतूमध्ये असते. त्यातच घरगुती भोजनाऐवजी हॉटेलिंग करण्याकडे अनेक मंडळींचा कल वाढतो; परंतु हॉटेलच्या जेवणाऐवजी शहरापासून काही अंतरावर एखाद्या फार्म हाउसवर हुरडाचा बेत आखण्याकडे काही मंडळींचा कल वाढत आहे.
ठळक मुद्देनिसर्ग पर्यटन : आगळ्यावेगळ्या मेजवानीकडे खवय्यांचा वाढला कर्ल