शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पूर्व भागातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:23 AM

नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील शेतकºयांना परतीच्या पावसाचे वेध लागले असून, सध्या खरिपाची पिके पूर्णत्वास आल्याने शेतकºयाचे लक्ष रब्बी हंगामाच्या तयारीवर लागले आहे. गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे.

एकलहरे : नाशिक तालुक्यातील पूर्व भागातील शेतकºयांना परतीच्या पावसाचे वेध लागले असून, सध्या खरिपाची पिके पूर्णत्वास आल्याने शेतकºयाचे लक्ष रब्बी हंगामाच्या तयारीवर लागले आहे. गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे.  नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शीलापूर, माडसांगवी, गंगावाडी या भागातील शेतकरी बाराही महिने भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. त्यात प्रामुख्याने कोबी, फ्लॉवर, मेथी, शेपू, कोथिंबीर, भेंडी, गवार, वांगे याबरोबरच कारले, गिलके, भोपळा, दोडका, डांगर या पालेभाज्या व फळभाज्यांचे पिके बारमाही घेतली जातात. हा सर्व शेतमाल नाशिकरोड सिन्नरफाटा मार्केट, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचबरोबर सायखेडा, पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत भाजीपाला विक्रीसाठी नेला जातो. किरकोळ भाजीपाला विक्रेते मोटारसायकलवर गाठोडे बांधून किंवा एक दोन क्रेट ठेवून नाशिकरोड उड्डाण पुलाखाली तसेच जेलरोड सायट्रिक कंपनीच्या समोरील भाजीबाजारात विक्रीसाठी पाठवितात. फळभाज्या व पालेभाज्यांच्या बाजारातील आवकेवरच लिलावाचे भाव अवलंबून असल्यामुळे पूर्व भागातील शेतकºयांकडून बाजारात एकाच प्रकारच्या भाजीपाल्याची जादा आवक होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यामुळे पंचक्रोशीतील शेतकरी शेतातील माल काढणीचे वेळापत्रकाही ठरवून घेतले आहे.रब्बीवर आशा लागूनपोळ्याच्या आमावस्येनंतर सुरू होणाºया भाद्रपदाच्या पहिल्या पंधरवड्याला सुना भादवा आणि दुसºया पंधरवड्याला जेवता भादवा अर्थात पित्रुपक्ष म्हणतात. भाद्रपदाचे ऊन फारच कडक असते. या उन्हाचा काही पिकांना लाभ तर काहींना नुकसान पोहोचते. अशा वेळीच परतीच्या पावसाला सुरुवात होत असल्याने हा पाऊस शेतीसाठी खूपच लाभदायी असतो. या पावसामुळे विहिरींना पाणी उतरते पुढे हेच विहिरीचे पाणी रब्बी हंगामातील पिकांनाही उपयुक्त ठरते. सप्टेंबरअखेर व आक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात सोयाबीन, भुईमूग, मका, कपाशी, बाजरी, तूर, मूग, मठ ही पिके काढली जातात व त्यानंतर शेतकरी रब्बीच्या तयारीला लागतो. दसरा ते दिवाळी दरम्यान शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरबरा, ज्वारी, कांदे ही पिके पेरण्यास सुरुवात करतात.पिकअपवाल्यांची चांदीनाशिक तालुका पूर्व भागातील बहुतांश शेतक-यांकडे शेतीमाल वाहतूक करण्यासाठी स्वत:च्या मालकीचे वाहने आहेत, परंतु ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी शेअरवर पिकअप व्हॅनची सोय आहे. परिसरातील चार ते पाच शेतकरी एकत्र येऊन आपला भाजीपाला गाठोडे किंवा क्रेटच्या नगाप्रमाणे भाडे आकारून व्हॅनचालकाला सोपवितात. कांद्याच्या हंगामात रोज पिकअपला भाडे मिळते. एका ट्रिपला साधारण कमीत कमी अंतरासाठी ८०० ते १००० रुपये भाडे आकारले जाते. दिवसातून एक किंवा दोन ट्रीप पूर्ण केली जाते. या भागातील काही शेतकºयांनी शेती व्यवसायाला जोड म्हणून पिकअप भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या