नाशिक : दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याने या मुहूर्तावर सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे. गेल्या वर्षी राज्यावर दुष्क ाळाचे सावट असतानाही शहरातील सराफ बाजारात दसऱ्याच्या मुहूर्तावर जवळपास ३५ ते ४० कोटींची उलाढाल झाली होती. त्यात यावर्षी आणखी भर पडणार असून, सर्वत्र पाऊस चांगला झाल्याने पीकपाणी चांगले येण्याची अपेक्षा असल्याने यावर्षी सराफ बाजारात शंभर कोटींपर्यंत उलाढाल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.वाहन बाजारातही मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत असून, नवरात्रीतील नऊ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्री झाली आहे. दसºयाच्या मुहूर्तावर बाजारात वाहनविक्रीचा उच्चांक गाठला जाण्याची वेगवेगळ्या कंपन्यांच्या वितरकांना आशा आहे.बांधकाम व्यवसायातही या नवरात्रोत्सवात चांगले वातावरण असून, शहरातील विविध पूर्ण झालेल्या व निर्माणाधीन प्रकल्पांवर ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. बांधकाम व्यवसायात परवडणाºया घरांना मोठी मागणी असली तरी दसºयाच्या मुहूर्तावर अनेकजण मोठ्या आणि प्रशस्त फ्लॅटसह रो-बंगलोच्या खरेदीलाही पसंती देत आहे. शहरातील सराफ व्यवसायात गेल्यावर्षी यात सर्वाधिक ३४ ते ३५ कोटींच्या सोन्याची विक्री झाली, तर ५ ते ६ कोटी चांदीच्या वस्तूंची विक्री झाली होती.यावर्षी यात वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. दसºयाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत सोने ३७ हजार ८०० प्रती १० ग्रॅम तर चांदी ४५ हजार ४०० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. परंतु, दागिन्यांवरील घडणावळीच्या प्रभावाने वेगवेगळ्या सराफी पेढ्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे दर वेगवेगळे असल्याचे दिसून येत आहे. त्यात ग्राहकांकडून अत्याधुनिक व पारंपारिक कलाकुसर असलेल्या दागिन्यांची घडणावळ आणि विश्वासार्हता असलेल्या व्यावसायिकांना ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे.सोन्यातील गुंतवणुक अनेक पटीने लाभ मिळवून देणारी असल्याने दसºयाच्या मुहूर्तावर सोने खरेदीला महत्त्व असते. त्यामुळे सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असतानाही ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात सोने खरेदीचा उत्साह दिसून येत असून, त्यासाठी ग्राहकांकडून त्यांच्या पसंतीच्या दागिन्यांची आगाऊ बुकिंगही करून ठेवली आहे. यात प्रामुख्याने शुद्ध सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र, सोनसाखळी, अंगठी, वेढा यांसारख्या दागिन्यांसह चांदीच्या भांड्यांमध्ये थाळी, ग्लास, वाटी, यांसारख्या गृहोपयोगी, पूजेच्या साहित्याला ग्राहकांकडून चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे.यावर्षी सराफ बाजारात शंभर कोटींपर्यंत उलाढाल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वाहन बाजारातही मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत असून, नवरात्रीतील नऊ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्री झाली आहे.यावर्षी सोन्याचे भाव वधारलेले असतानाही दसºयाच्या मुहूर्तावर ग्राहकांनी नेहमीप्रमाणेच उत्साहाने दागिने खरेदी करण्यासाठी बुकिंग केली आहे. यात शुद्ध सोन्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक असून पारंपरिक दागिन्यांसह चांदीच्या वस्तू खरेदीकडेही ग्राहकांचा कल अधिक आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात शांतता असली तरी नवरात्रोत्सवात बाजाराला तेजी मिळाली असून, दसºयाच्या मुहूर्तावर सोने खरेदीचा उच्चांक गाठला जाण्याची शक्यता आहे.- नीलेश बाफना, संचालक, बाफना ज्वेलर्ससोन्यात गुंतवणूक केल्याने मोठा परतावा मिळत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून आले आहे. गेल्या दहा वर्षांत सोन्यातील गुंतवणूकदारांना सुमारे अडीचशे-तीनशे टक्क्यापर्यंत फायदा झाला आहे. त्यातच यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे शेतीत चांगले उत्पादन येणार असल्याने शेतकरी वर्गातून सोने खरेदीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची शक्यता असून, यावर्षीचा दसरा संपूर्ण दिवसभर व्यावसायासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.- मयूर शहाणे, संचालक, मयूर अलंकारबांधकाम व्यवसायात नवरात्री आणि दसºयाचा उत्साह संचारला असून, बाजारपेठेला दिवाळीचेही वेध लागले आहेत. गेल्या काही काळात तयार झालेल्या आणि लॉँच झालेल्या सर्वच प्रकल्पांना ग्राहकांची चांगली पसंती मिळाली आहे. त्यामुळे येणाºया काळात शहरातील द्वारकासारख्या मध्यवर्ती भागात व्यावसायिक प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. ग्राहक बांधकाम प्रकल्पांची चौकशी करून पसंतीचे घर तत्काळ बुक करण्याला प्राधान्य देत आहे. त्यासोबतच व्यावसायिक वापराच्या गाळ्यांसाठीही ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात चौकशी सुरू आहे. यातील बहुतांश दुकानांची दसºयाला विक्री होऊ शकते. - निखिल रुंग्टा, संचालक, रुंग्टा ग्रुपव्याजदरातही मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. त्यामुळे नवरात्री आणि दसºयाच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात घरांची बुकिंग झाली आहे. नवरात्रात मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी चौकशी केली आहे. त्यांच्या पैकी अनेकजण दसºयाच्या मुहूर्तावर खरेदी करणार असून, उर्वरित ग्राहकही येणाºया काळात दिवाळीपर्यंत निश्चितच घर खरेदी करतील, अशी अपेक्षा असल्याने बांधकाम व्यवसायात उत्साह संचारला आहे.- नरेश कारडा, व्यवस्थापकीय संचालक, कारडा कन्स्ट्रक्शन्सदसºयाच्या पार्श्वभूमीवर वाहनबाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. एसयूव्हीसोबतच लक्झरियस कार आणि कमी बजेटमधल्या वाहनांना ग्राहकांची पसंती असून, ग्रामीण भागातील ग्राहकांची मालवाहून चारचाकी वाहनांना पसंती मिळत आहे. वाहन विक्री वाढली असून, दसºयाच्या दिवशी यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.- प्रीतेश शाह, संचालक, जितेंद्र व्हिल्स
सराफांना कोटींच्या उलाढालीची आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 12:54 AM