सायखेडा : महाजनपुर शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात घोडा ठार झाला आहे. महाजनपुर गावातील पाझर तलाव शिवारात गट नंबर ३१४ येथे कांदे काढलेल्या शेतात शिंगवे येथील मेंढपाळाने मेंढ्यांची राहुटी दिली होती. मेंढ्यांच्या चहू बाजूला जाळे बांधले होते मात्र बाहेर दोन घोडे ,कुत्रा आणि कुटुंब होते. भक्षांच्या शोधात आलेल्या बिबट्याला जाळीमुळे मेंढ्यांवर हल्ला करता आला नाही, मात्र जवळ असलेल्या घोड्यावर हल्ला करून त्याला ओढीत शेजारी असलेल्या उसाच्या शेताकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. दीड वर्ष वयाच्या घोड्याला ओढून नेणारा बिबटया मोठा आणि ताकदवान असला पाहिजे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बिबट्याने घोड्याच्या मानेवर जखमा केल्याचे वनकर्मचाºयांनी सांगितले. सुदैवाने मेंढपाळाचे कुटुंब शेजारी झोपलेले होते. शिवाय आजूबाजूला घरे असल्याने माणसांवर हल्ला चढवला नाही. या ठिकाणी सरपंच बचवंत फड यांनी वनविभागाला तात्काळ कळविले आहे. वनकर्मचारी टेकनर, शेख यांनी पिंजरा लावला असून मृत घोड्याचा पंचनामा केला.मेंढपाळांचे संसार उघड्यावर असतात शिवाय आर्थिक परिस्थिती बेताची असते. त्यात जर प्राणी गमवावा लागला तर मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे वनविभागाने तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच बचवंत फड, संपत फड, संदिप फड, यांनी केली आहे-----------------------भय येथील संपेनाआठ दिवससापूर्वी औरंगपूर येथे बिबटया जेरबंद झाला. भेंडाळी शिवारात एका ठिकाणी पिंजरा लावलेला आहे तर आज महाजनपुर शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार झाला. या सर्व पाच किलोमीटरच्या परिघात बिबटे आहे तरी किती ?पकडलेले बिबटे परत येत आहे, अशी शंका उपस्थित होत आहे. आज मुक्याप्राण्यांचा नाहक बळी जात आहे तर उद्या मनुष्यावर देखील हल्ला होऊ शकतो. वनविभाग केवळ पिंजरा लावून मोकळे होतात कायम स्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशी मागणी सोपान खालकर यांनी केली आहे.
सायखेडा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 3:08 PM