चौकट-
या अपेक्षांची पडली भर...
नोकरीबरोबरच मुलाकडे शेतीही हवी. शिक्षणाबरोबरच मुलाकडे तांत्रिक कौशल्य कसले आणि किती आहे. मुला - मुलीकडची घरची आर्थिक स्थिती चांगली असावी.
चौकट-
२) या अपेक्षा झाल्या कमी
मुलगा शासकीय नोकरीतच असण्याची गरज नाही
ज्या क्षेत्रात मुलगा त्याच क्षेत्रातील मुलगी हवी
मुलाला नोकरी असलीच पाहिजे असे गरजेचे नाही
चौकट-
कोट-
कोरोनामुळे जवळपास २२ ते २५ टक्के लोक नोकरी नसणाऱ्या मुलांनाही प्राधान्य देऊ लागले आहेत. घरची शेतीवाडी असली किंवा चांगला व्यवसाय करणारा असला तरी त्या मुलाला आता होकार दिला जातो. - राकेश खैरनार, संचालक, रेशमबंध विवाह मंडळ, नाशिक
कोट-
कोरोनामुळे अनेक लोकांनी आता आपल्या अपेक्षांमध्ये बदल केला आहे. शासकीय नोकरीवालाच असावा किंवा बाहेरच्या देशातलेच स्थळ हवे. यावर अडून बसणारे वधू-वर आता ॲडजस्टमेंट करायला तयार झाले आहेत. चांगलं अनुरुप स्थळ असेल तर त्याला लगेच होकार दिला जात आहे. -सिध्दार्थ भालेराव, मंगल परिणय विवाह मंडळ