नाशिक : देवळाली कॅम्प येथे गेल्या बुधवारी (दि.२९) पिंजऱ्यात जेरबंद झालेला प्रौढ नर बिबट्याची रवानगी बोरिवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात वनविभागाकडून करण्यात आली. नाशिक परिक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यांपैकी चार बिबटे आणि सिन्नर परिक्षेत्रातील चिंचोलीत जेरबंद झालेला एक असे एकूण पाच बिबटे जुलै महिन्यात गांधी उद्यानात रवाना करण्यात आले आहेत.दारणाकाठालगतच्या नाशिक, सिन्नर परिक्षेत्रांतर्गतच्या गावांमध्ये मागील महिनाभरापासून बिबटे जेरबंद करण्याच्या मोहिमेला वेग आला आहे. अद्याप दोन्ही रेंजमधील गावांमधून एकूण नऊ बिबटे जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. दारणा नदीच्या दोन्ही बाजूंच्या गावांच्या बांधांवर पिंजऱ्यांची तटबंदी करण्यात आली आहे. यामुळे या भागातील बिबटे जेरबंद होऊ लागले असून, दारणाकाठालगतच्या पंचक्र ोशीत पसरलेली बिबट्यांची दहशत कमी होण्यास मदत होत आहे.दोनवाडे, बाभळेश्वर या गावांमध्ये झालेल्या मानवी हल्ल्यातील मृतांच्या जखमांमधून संकलित केलेल्या बिबट्याच्या लाळेचे नमुने हैदराबादच्या प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर या प्रयोगशाळेकडून वनविभागाला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालात दारणा काठा लगत मानवी हल्ले हे ‘नर’ बिबट्याने केले असल्याचा निर्वाळा देण्यात आला. यामुळे वनविभागापुढील पेच काही अंशी सुटला असला तरी नेमका कोणता नर आणि तो नरक्षभक झाला आहे का? हे प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. यामुळे बिबट्यांची धरपकड दारणाकाठावर अशीच काही दिवस सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत नाशिक वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून देण्यात आलेआहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे़...तोपर्यंत बिबटे भोगणार ‘शिक्षा’नाशिकमध्ये जेरबंद झालेले नर व प्रौढ मादी बिबटे थेट बोरिवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात पाठविले जात असले तरी तेथेही त्यांना पिंजºयातून मुक्तता अद्यापपावेतो मिळालेली नाही. जोपर्यंत नरभक्षक बिबट्याचा कोणता हे डीएनए चाचणीवरून स्पष्ट होत नाही, तोपर्यंत तरी तेथील बिबट्यांची नैसर्गिक अधिवासात मुक्तता अशक्य असल्याचे एका वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.दारणाखोºयात झालेले मानवी हल्ले हे नराचे असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे गांधी उद्यानात कैदेत असलेल्या दोन्ही मादी बिबट्यासह पळसेत जेरबंद झालेला कमी वयाचा नर बछड्याचा सुटकेचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. त्यादृष्टीने नाशिक पश्चिम वनविभागाकडून पत्रव्यवहारही केला जाण्याची चिन्हे आहेत. परवानगीनंतर या बिबट्यांची सुटका होऊ शकेल़
नाशिकच्या पाच बिबट्यांना बोरिवलीत ‘पाहुणचार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 1:30 AM
देवळाली कॅम्प येथे गेल्या बुधवारी (दि.२९) पिंजऱ्यात जेरबंद झालेला प्रौढ नर बिबट्याची रवानगी बोरिवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात वनविभागाकडून करण्यात आली. नाशिक परिक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यांपैकी चार बिबटे आणि सिन्नर परिक्षेत्रातील चिंचोलीत जेरबंद झालेला एक असे एकूण पाच बिबटे जुलै महिन्यात गांधी उद्यानात रवाना करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देमादींची होणार सुटका : देवळाली कॅम्पचा बिबट्याही रवाना