शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘नाशिक वनराई’मध्ये गिधाडांचा पाहुणचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 10:16 PM

नाशिक : शहराच्या वेशीवर म्हसरूळ शिवारात वनविभागाच्या गुदामाच्या जागेवर साकारल्या जाणाऱ्या 'नाशिक वनराई'मध्ये सोमवारी (दि.४) सकाळी लांब चोचीच्या ५० ते ६० गिधाडांनी हजेरी लावून पाहुणचार घेतला. नामशेष होण्याच्या मार्गावर व संवर्धनाच्या धोकादायक स्थितीत पोहोचलेले निसर्गाचे सफाई कामगार म्हणजे गिधाडे शहराच्या जवळ चांगल्या संख्येने दिसून येणे हे शहराची नैसर्गिक अन्नसाखळी विकसित होण्याच्या दृष्टीने शुभवर्तमान मानले जात आहे.

नाशिक : शहराच्या वेशीवर म्हसरूळ शिवारात वनविभागाच्या गुदामाच्या जागेवर साकारल्या जाणाऱ्या 'नाशिक वनराई'मध्ये सोमवारी (दि.४) सकाळी लांब चोचीच्या ५० ते ६० गिधाडांनी हजेरी लावून पाहुणचार घेतला. नामशेष होण्याच्या मार्गावर व संवर्धनाच्या धोकादायक स्थितीत पोहोचलेले निसर्गाचे सफाई कामगार म्हणजे गिधाडे शहराच्या जवळ चांगल्या संख्येने दिसून येणे हे शहराची नैसर्गिक अन्नसाखळी विकसित होण्याच्या दृष्टीने शुभवर्तमान मानले जात आहे.दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी जागतिक गिधाड संवर्धन दिन साजरा केला जातो. नाशिक शहर व परिसरात गिधाडे अपवादानेच दिसून येत होती. मात्र शहराबाहेर अंजनेरी, ब्रह्यगिरी, हरसूल, वाघेरा घाट, खोरीपाडा या भागात गिधाडांचे वास्तव्य पहावयास मिळते. अनेक वन्यजीव अभ्यासकांनी संशोधन करून गिधाडांची घरटीदेखील असल्याची नोंद केली आहे. हरसूलपासून अलीकडे तीन किलोमीटर अंतरावर खोरीपाडा या आदिवासी वस्तीवरील नागरिकांनी व तेथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीने वनविभागाच्या खांद्याला खांदा लावून चक्क गिधाडांचे उपाहारगृह मागील सहा ते सात वर्षांपासून यशस्वी करून दाखविले. खोरीपाडा डोंगरावर सुमारे २०० पेक्षा अधिक गिधाडे आढळून येतात. यामध्ये पांढºया पाठीची व लांब चोचीच्या दोन प्रजाती प्रामुख्याने आहेत. अधून-मधून इजिप्शियन गिधाड उपाहारगृहवर हजेरी लावतात मात्र त्यांची संख्या कमी आहे. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी गोदाकाठालगत टाकळी गाव सातपूर या भागांमध्ये झाडे दिसून येत होती. मात्र मागील काही वर्षांपासून गिधाडांनी शहराच्या वेशीपासून आपले स्थलांतर ग्रामीण भागात केले, असे पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड यांनी सांगितले. आपलं पर्यावरण संस्थेकडून विकसित केल्या जात असलेल्या नाशिक वनराईमधील वृक्षराजीने गिधाडांना आपल्याकडे आकर्षित करत येथील पाहुणचारासाठी जणू निमंत्रणच दिले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी मृत झालेली जनावरे वनराईजवळील डोंगराच्या पायथ्याला टाकून दिल्यामुळे गिधाडांचा थवा सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपली भूक भागविण्यासाठी वनराईत दाखल झाला. येथील खाद्यावर ताव मारून सुमारे तासभर५० ते ६० गिधाडांनी आपली भूक भागविली.----------लॉकडाउनमुळे वन्यजीव शहराजवळलॉकडाउन काळात नागरिकांची रस्त्यांवरील कमी झालेली वर्दळ, वाहनांचा थांबलेला गोंगाट यामुळे वन्यजीवदेखील शहराजवळ नजरेस पडू लागले आहे. गिधाडांच्या प्रजातीपैकी लांब चोचीची गिधाडे वनराईमध्ये तासभर मुक्कामास आली होती. येथील सुरक्षारक्षक कुमार याने त्यांची छायाचित्रे अचूकरीत्या टिपली. कुमार हा नेहमीप्रमाणे सकाळी वनराईमधील झाडांना पाणी देत होता त्यावेळी त्याला गिधाडांचा मोठा थवा आकाशातून थेट वनराईत उतरल्याचे दिसून आले. गिधाडांनी निवांतपणे येथील खाद्यावर आपली भूक भागविली आणि तासाभरानंतर पुन्हा डोंगराआड स्थलांतर केले.

टॅग्स :Nashikनाशिक